Maharashtra Lockdown: मुंबईकरांनो सावध व्हा; गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही बंद होणार

Maharashtra Lockdown: मुंबईकरांनो सावध व्हा; गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही बंद होणार
गेल्यावर्षी दादर परिसराचा समावेश असलेला जी-साऊथ वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता.

बाजारपेठांमधील गर्दी कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध येणार | Maharashtra Lockdown essential services

Rohit Dhamnaskar

|

Apr 15, 2021 | 8:21 AM

मुंबई: राज्यात लॉकडाऊन लागू करुनही बाजारपेठांमध्ये होणाऱ्या तुफान गर्दीमुळे आता राज्य सरकार अत्यावश्यक सेवाही बंदी करण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बाजारपेठांमधील गर्दी कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे. (Essential services also closed down of crowd gathers in market area says CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा, त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

पुण्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होणार?

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना वेळ पडल्यास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातून शहराकडे किराणा, भाजीपाला, फळे, दूध आदी अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी गर्दी होत असल्यास संबंधित दुकाने ही मोकळ्या जागेत स्थलांतरित करा. मोकळी जागा उपलब्ध नसेल आणि गर्दीवर नियंत्रण आणणे शक्य होत नसेल तर ती दुकाने बंद करण्याचे अधिकारही उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुंबई, पुणे आणि नागपुरातील बाजारपेठांमध्ये आजही गर्दीच

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे, हे वारंवार सांगूनही लोक सकाळच्या वेळेत बाजारपेठांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर अशा सर्वच शहरांमध्ये हे चित्र दिसत आहे. मुंबईच्या दादर परिसरात आज सकाळीही नागरिकांनी भाजीपाल्याच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी बाजार बंद करण्याचे आवाहन केले. तर पुणे यार्डातील बाजारपेठेतही खच्चून गर्दी झालेली पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या:

लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका; पोलीस महासंचालकांचं नागरिकांना आवाहन

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे थेट पंतप्रधानांना पत्रं

Maharashtra Lockdown: तुमची नोकरी-व्यवसाय जीवनावश्यक सेवांच्या यादीत येते का, पाहा ही संपूर्ण यादी

(Essential services also closed down of crowd gathers in market area says CM Uddhav Thackeray)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें