लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी, कचऱ्याच्या पोत्यापासून कुरिअर, पार्सलचा वापर, 10 दिवसात कोट्यवधींची दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागने दारुची तस्करी थांबवण्यासाठी छापेमारीची प्रक्रिया सुरु केली आहे. (Illegal liquor smuggling)

लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी, कचऱ्याच्या पोत्यापासून कुरिअर, पार्सलचा वापर, 10 दिवसात कोट्यवधींची दारु जप्त
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 9:58 PM

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनदरम्यान दारुची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागने ही तस्करी थांबवण्यासाठी छापेमारीची प्रक्रिया सुरु केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या दहा दिवसांत मोठ्या प्रमाणात छापे टाकले आणि तस्करी केली जात असलेली 2.75 कोटी रुपयांची दारू जप्त केली आहे. (Illegal liquor smuggling increased, crores of liquor confiscated in 10 days)

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दारूची ही अवैध तस्करी गोव्याहून ट्रकमधून केली जात होती. या तस्करीसाठी तस्करांकडून वेगवेगळे प्रकार अवलंबले जात होते. ज्यामध्ये ट्रकमध्ये कचर्‍याची पोती ठेवणे, औषधाच्या बॉक्समध्ये दारु लपवून ठेवणे आणि त्यावर मेडिसिनचं बिल लावणे, कुरिअर किंवा पार्सलच्या बहाण्याने दारूची तस्करी करणे या प्रमुख मोडस ऑपरेंडीचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्रवाईपासून वाचण्यासाठी दारू तस्कर अशी मोड्स ऑपरेंडी वापरत आहेत. एवढेच नव्हे तर मे महिन्यात मोठ्या प्रमाणात दारुच्या मालासह पकडलेल्या चार ट्रकपैकी तीन ट्रक मुंबईत येणार होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेगवेगळ्या कारवाया

  • 19 मे रोजी पनवेल भागात छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध तस्करीसाठी ट्रकमधून गोव्यातून महाराष्ट्रात आणलेली सुमारे 57 लाखांची अवैध दारू जप्त केली. ट्रकच्या आत ही दारू पोत्यांत भरलेल्या कचर्‍याखाली लपवली होती.
  • 20 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मोठ्या कारवाईत एका ट्रकमधून सुमारे 44 लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली. ट्रकच्या आत ही दारू समुद्र आणि इतर ठिकाणच्या पोत्यांत भरलेल्या कचर्‍याखाली लपवली होती.
  • 25 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने खारघर (नवी मुंबई) भागात छापा टाकला आणि ट्रकच्या आतून सुमारे 68 लाखांची अवैध दारू जप्त केली. ही दारू कुरिअर, पार्सलमध्ये लपवून ठेवली होती आणि ती गोव्यातून महाराष्ट्रात आणली जात होती.
  • 29 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवी मुंबईतील तुर्भे भागात कार्रवाई करत असताना ट्रकमधून मुंबईत आणली जाणारी 38 लाख रुपयांची अवैध दारू पकडली. ही दारू औषधांच्या कार्टूनच्या आत लपवून ठेवण्यात आली होती, तसेच ड्रग्जची बिले त्या कार्टूनवर चिकटविण्यात आली होती.
  • गेल्या दहा दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 2000 बाटल्या मद्य जप्त केले असून यामध्ये अनेक ब्रँडच्या दारूचा समावेश आहे.

7 जण अटकेत

सदर कारवाईत आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीत गोव्याहून दारूची तस्करी करणारी गैंग आणि ती दारु मुंबईत कुठे पोहोचवली जाणार होती, याबाबतची माहिती मिळविली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (महाराष्ट्र) आयुक्त कांतीलाल उमप यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, लोकांना कोठेही अवैध दारू तस्करीची माहिती मिळाली तर त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर (18008333333) याबाबतची माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांनी नावं गुप्त ठेवून अशा तस्करांवर कठोर कारवाई केली जाईल.

इतर बातम्या

सासूसोबत जोरदार भांडण, रागाच्या भरात सात महिन्याच्या बाळाला जबर मारहाण, नागपूरमध्ये खळबळ

प्रेमात विकृती ! महिलेचा वारंवार लग्नाचा हट्ट, प्रियकराचं संतापजनक कृत्य

अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती, रुग्णालयात उपचार सुरु

(Illegal liquor smuggling increased, crores of liquor confiscated in 10 days)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.