AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवर संकट घोंघावतंय, हवामान खात्याचा रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईवर संकट घोंघावतंय, हवामान खात्याचा रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याचा रेड अलर्ट, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
| Updated on: Jul 08, 2024 | 7:37 PM
Share

मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे. पावसाने आज सकाळी उघडीप घेतली होती. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा सुरळीत होण्यास मदत झाली. पण मुंबईत आता पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून आज सकाळी पाऊस थांबल्यानंतर मुंबईला आधी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता हवामान विभागाकडून मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत उद्या सकाळपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे रेल्वे स्थानकांवर पाऊस सुरु आहे. दुसरीकडे संध्याकाळची वेळ असल्यामुळे काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळलेली आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे चाकरमानी आपल्या घरी जाण्याचा प्रयत्नात आहेत. जास्त पावसामुळे लोकल सेवा ठप्प होण्यापूर्वी घरी लवकर पोहोचावं यासाठी प्रवाशांचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे वांद्रे परिसरात वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. तसेच मुसळधार पावसामुळे काही मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे ‘या’ मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द

  • 11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
  • 12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
  • 11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
  • 12123 छत्रपती शिवाजी महाराज – पुणे डेक्कन क्वीन जेसीओ ८.७.२०२४.
  • 12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
  • 11008 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
  • 12128 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
  • 11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
  • 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन जेसीओ ८.७.२०२४.
  • 12110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४ हि ट्रेन इगतपुरी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. (इगतपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशत: रद्द)
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.