AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे, सोप्या भाषेत समजून घ्या राष्ट्रवादीचा निकाल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला आहे. या निकालात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार यांच्या गटला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे, सोप्या भाषेत समजून घ्या राष्ट्रवादीचा निकाल
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 15, 2024 | 6:21 PM
Share

मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना आधी पक्ष कुणाचा आहे, याबाबत निकाल दिला. पक्षाची घटना, रचना आणि संख्याबळ या त्रिसूत्रीच्या आधारावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याबाबत निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तसेच त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गटातील हा वाद आहे. ही पक्षातील फूट नाही. दोन्ही गटांनी पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार कारवाई करता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

  • अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे.
  • अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरविण्यात आलं आहे.
  • अजित पवार गटाच्या 1, 3, 4 नंबरच्या याचिका फेटाळण्यात आल्या आणि शरद पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरविण्यात आलं आहे.
  • कुणीही अपात्र नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
  • विधीमंडळातील बहुमत पाहता मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचा आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला.
  • दहावीच्या सूचीचा वापर हा पक्षातील बेशिस्तपणासाठी वापरता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
  • दहावी सूचीचा वापर पक्षातील बहुमताला धमकावण्यासाठीदेखील करता येणार नाही, असंही विधानसभा अध्यक्ष म्हणाले आहेत.
  • पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही तर गट तयार झाला होता, असं विधानसभा अध्यक्ष निकाल वाचताना म्हणाले.
  • पक्षीय रचना, घटना आणि विधीमंडळ बळ या त्रिसूत्रीवर आपला हा निकाल असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं.
  • पक्षातील नाराजी म्हणजे विधीमंडळ पक्षातील नाराजी नाही. तसेच पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग असं म्हणता येणार नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे.
  • शरद पवारांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
  • कुणीही पक्ष सोडलेला नाही. दोन गट पडले आहेत. या दोन गटातील हा पक्षांतर्गत वाद आहे. कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सुचीनुसार कारवाई करता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
  • शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळत अजित पवार गटाचे आमदार पात्र आहेत, असा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला.
  • अजित पवार यांच्या गटाकडे 41 आमदार आणि 2 खासदार आहेत. तर शरद पवार गटाकडे 14 आमदार आणि 4 खासदार आहेत. यापैकी कुणीही अपात्र नाहीत, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?