AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दोन दिवसात लालपरी पूर्वपदावर येईल’ म्हणत अनिल परबांनी मागितली माफी, सदावर्तेंवरही जोरदार हल्लाबोल

पुढील दोन दिवसांत एसटीचे 100 टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील आणि महाराष्ट्राची लालपरी (ST Bus) पूर्णपणे सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली.

'दोन दिवसात लालपरी पूर्वपदावर येईल' म्हणत अनिल परबांनी मागितली माफी, सदावर्तेंवरही जोरदार हल्लाबोल
Anil Parab - STImage Credit source: Anil Parab Twitter
| Updated on: Apr 20, 2022 | 4:29 PM
Share

मुंबई : पुढील दोन दिवसांत एसटीचे 100 टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील आणि महाराष्ट्राची लालपरी (ST Bus) पूर्णपणे सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. परब म्हणाले की, सध्या राज्यातील एसटीची 90 टक्के सेवा सुरु झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण सेवा सुरु होईल. एसटीचे 70 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 82 हजारांच्या आसपास आहे. तसेच राज्याततल्या अनेक आगारात 100 टक्के कर्मचारी (ST Workers) कामावर परतले आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचारी देखील येत्या दोन दिवसात कामावर परततील आणि राज्यातली एसटीची सेवा पूर्णपणे सुरु होईल.

अनिल परब म्हणाले की, संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची, बडतर्फची कारवाई करण्यात आली होती. त्यांनादेखील आम्ही कामावर परत घेतलंय. तसं आम्ही उच्च न्यायालयात सांगितलं होतं. 22 एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर परत येतील त्यांनाही आम्ही परत रुजू करुन घेऊ. यापूर्वी 7 वेळा आम्ही कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जाईल.

सदावर्तेंवर टीका

दरम्यान अनिल परब यांनी संप काळात राज्यातल्या जनतेचं आणि एसटीचं खूप नुकसान झाल्याने खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, दुर्दैवाने गरीब कर्मचाऱ्यांना या संप काळात भरकटवलं गेलं, चुकीच्या मार्गावर नेलं, त्यांच्या भावनेशी खेळून, त्यांच्याकडून पैसे उकळून स्वतःची घरं भरली. या सगळ्या गोष्टी पाच महिन्यात घडल्या. या कष्टकऱ्यांच्या जोरावर काही लोकांची श्रींमती किती वाढली हे आपण पाहात आहोत, येत्या काळात सगळं काही सरमोर येईल, असं म्हणून परब यांनी विधीज्ञ आणि संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली.

एसटी कामगारांना फसवून पैसे उकळले

गुणरत्न सदावर्तेंबद्दल बोलताना परब म्हणाले की, एसटी कामगारांच्या भावनांशी खेळ केला. अशिक्षित, गरीब कामगारांना दररोज भूलथापा देऊन वेगवेगळ्या अफवा पसपवून एक सिंडिकेट तयार करुन त्यांना लुटलं. त्यांच्याकडून पैसे घेतले, हे पैसे कोट्यवधींमध्ये होते. इतके पैसे घेतले की, या लोकांना घरात पैसे मोजायचं मशीन ठेवावं लागलं. वेगवेगळ्या गाड्या घेतल्या, नवीन जागा घेतल्या. दुसऱ्या बाजूला या कामगारांना 5 महिने पगार नाही, तरिही त्यांच्या खिशात हात घालून त्यातले पैसे घेतले. मात्र कामगारांना या गोष्टी समजायला वेळ लागला.

अनिल परबांकडून माफी

एसटी कामगारांविषयी बोलताना परब म्हणाले की, “या लढाईत कामगारांच्या पदरात काहीच पडलं नाही. इतर राज्यांच्या तुलनेत आम्ही चांगला पगार दिला. मात्र हा संप बराच काळ चालला. मी एसटी महामंडळाचा अक्ष्यक्ष म्हणून माफी मागतो की, गेल्या पाच महिन्यात राज्यातल्या जनतेला जो त्रास झालाय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे असे प्रसंग येणार नाहीत. त्याचबरोबर गरीबांची जीवनवाहिनी सुरु राहिली पाहिजे, असं मला वाटतं.”

इतर बातम्या

Gunratna Sadavarte : होय, एस.टी.कर्मचाऱ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतले, गुणरत्न सदावर्तेची कबूली, मर्जीनं पैसे घेतल्याचाही दावा

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, मात्र आता ताबा कोल्हापूर पोलिसांकडे! प्रकरण काय?

Gunratna Sadavarte Solapur : गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात, सोलापुरातही गुन्हा दाखल, छावा संघटनेची फिर्याद

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.