AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA : इंडिया आघाडी आज मोठा डाव टाकणार; कमळाला टक्कर देणारा लोगो आणि झेंड्यातील ‘तो’ रंग भाजपला बेरंग करणार?

India Alliance may be Announced Logo : इंडिया आघाडी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचा हा डाव भाजपला कोंडीत टाकू शकतो. दुपारच्या पत्रकार परिषदेत होणार मोठी घोषणा असल्याची शक्यता असून देशाच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

INDIA : इंडिया आघाडी आज मोठा डाव टाकणार; कमळाला टक्कर देणारा लोगो आणि झेंड्यातील 'तो' रंग भाजपला बेरंग करणार?
| Updated on: Sep 01, 2023 | 7:54 AM
Share

मुंबई : 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधक मुंबईमध्ये एकत्र आले आहेत. ग्रंँझ हयात हॉटेलमध्ये बैठक झाली आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सर्व निजोजन पाहिलं. विरोधी पक्षातील काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, आरजेडीचे नेते लालू यादव आणि त्यांचा मुलगा तेसस्वी यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि शरद पवार हे बडे नेते उपस्थित होते. जवळपास 28 पक्षांचे नेते एका ठिकाणी जमले आहेत. इंडिया आघाडी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचा हा डाव भाजपला कोंडीत टाकू शकतो.

इंडिया आघाडी लोगोची घोषणा करणार?

इंडिया आघाडीने आपला लोगो फायनल केल्याची माहिती समजत आहे. या लोगोचं डिजाईन आधीच बनवलं असून इंडिया आघाडीमधील पक्षांना ते पटलं नव्हतं. त्यानंतर आ पुन्हा चर्चा झाली आणि काही बदल केल्यावर आता सर्वांनी सहमती दिल्याची माहिती समजत आहे. इंडिया आघाडी आपल्या लोगोची अधिकृतपणे घोषणा केली जावू शकते. या लोगोमध्ये भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

इंडिया आघाडीसाठी शुक्रवार महत्त्वाचा दिवस

शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत बैठका सुरू चालतील. यामध्ये युतीबाबत चर्चा होईल. इंडिया आघाडीचा लोगो प्रसिद्ध केला जाईल, त्यानंतर दुपारी 3.30 वाजता इंडिया आघाडीतील नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. गुरूवारी झालेल्या बैठकीनंतर बोलताना, शुक्रवारी म्हणजे आज होणाऱ्या बैठीकीमध्ये जागावाटप, किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करणार आहेत.

भाजपच्या हालचाली वाढल्या

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर भाजपच्य गोटात हालचाली वाढल्या आहेत. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. केंद्र सरकार वन नेशन वन इलेक्शन असं बिल संसदेत पास करणार असल्याचं बोललं जात आहे. डिसेंबरमध्ये निवडणुका लागणार असल्याच्या चर्चांनीसुद्धा जोर धरला आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.