मुंबईः आयपीएलसाठी (IPL) वानखेडे, ब्रेबॉन, डीवाय पाटील या स्टेडियममध्ये (Stadium) 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत आज मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार विभागावर चर्चा करीत असताना आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईतील गावठाण, कोळवाड्यातील प्रश्न अग्रक्रमाने मांडले. तसेच याचवेळी त्यांनी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांची लीज हे विविध विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले.