AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navnath Ban: MPSC आंदोलनाआडून त्या मतदारसंघासाठी रोहित पवारांची मोर्चेबांधणी? नवनाथ बन यांचा मोठा आरोप

Navnath Ban on Rohit Pawar : MPSC विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आंदोलनावर यशस्वी तोडगा कधी निघले याची जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठेवणीतील बॉम्ब टाकला. त्यांनी पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Navnath Ban: MPSC आंदोलनाआडून त्या मतदारसंघासाठी रोहित पवारांची मोर्चेबांधणी? नवनाथ बन यांचा मोठा आरोप
नवनाथ बन यांची रोहित पवार यांच्यावर टीका
| Updated on: Oct 11, 2026 | 11:46 AM
Share

Navnath Ban on Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यात ठिय्या दिला आहे. एमपीएससी आंदोलन संपणार असे वाटत असतानाच ते पुन्हा पेटले. विद्यार्थी अजूनही एस एम. जोशी पुलावर ठाण मांडून आहेत. पोलिसांच्या आवाहनालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान आज भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर मोठा आरोप केला. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आडून रोहित पवार त्यांची राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप त्यांनी केली.

भिमनवार तो बहाणा है…

नवनाथ बन यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार आणि आंदोलकांवर निशाणा साधला. हे आंदोलन भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी आहे की त्यातून इतर इपसित साध्य करायचं आहे, असा सवाल त्यांनी केला. मी पुन्हा सांगतो, “भीमनवार तो बहाणा है, देवाभाऊ निशाणा है” असे बन म्हणाले. एमपीएससी विद्यार्थी आंदोलनातून सरकारला शिव्या घालण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आंदोलनाच्या नेमक्या उद्दिष्टांवर त्यांनी निशाणा साधला.

रोहित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचंय

आमदार रोहित पवार यांना या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांनी यावेळी काही व्हिडिओ दाखवले. त्यात रोहित पवार यांना खांद्यावर घेऊन त्यांचे कार्यकर्ते नाचत आहेत. जर का हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन असेल तर तिथल्या एका विद्यार्थ्याला खांद्यावर घेऊन त्यांनी नाचायला पाहिजे होते. रोहित पवार यांना नेता बनवण्यासाठीचा हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला.

हडपसर विधानसभा मतदारसंघावर रोहित पवारांचा डोळा?

यावेळी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक मोठा आरोप केला. त्यानुसार, आमदार रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनाधार कमी झाला आहे. केवळ 1200 मतांनी ते निवडून आलेत. पुढच्या वेळी कदाचित ते निवडून येणार नाहीत. कर्जत-जामखेडमध्ये मध्यंतरी दुष्काळाची बैठक झाली, रोहित पवार तिकडे फिरकले नाहीत. कर्जत-जामखेड मतदारसंघ सोडून रोहित पवार हे पुण्यातील हडपसर मतदारसंघाची पुढील निवडणुकीसाठी चाचपणी करत आहेत. त्यांच्या लॉचिंगसाठीच एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठीच त्यांचा उदोउदो करण्यात येत आहे असा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे.

रोहित पवार यांना असे पेड कॅम्पेन करायचे असतील तर त्यांनी जरूर करावेत पण महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील, विदर्भातील गोरगरिब विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करू नका, असा टोला बन यांनी हाणला. मध्यंतरी रोहित पवारांनी 12 दिवस पंढरपूरमध्ये आंदोलन केले त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया दिली नाही, असे बन म्हणाले.

एमपीएसी अध्यक्षांचा राजीनाम्याशिवाय माघार नाही

गेल्या दहा दिवसांपासून एस एम जोशी पुलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात जालना आणि नांदेड वरून सहभागी होण्यासाठी दीडशे विद्यार्थी रेल्वेने आले आहेत. अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलनातून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Follow Us
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल