AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | ‘इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे, ते उदयोग-धंदे पळवतील ‘ असे होत नाही – अजित पवार

कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा मुद्दा ते सातत्याने मांडत आहेत . मात्र याबाबतची भूमिका सरकारने आता जाहीर केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेली पगारवाढ दिली आहे. जोपर्यंत त्रिसदस्यीय समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत थांबावे लागणार आहे

Ajit Pawar | 'इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे, ते उदयोग-धंदे पळवतील ' असे होत नाही - अजित पवार
ajit pawar
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 2:20 PM
Share

मुंबई – जिल्ह्यातील नियमावलीत व राज्यातील नियमावलीत थोडी तफावत होती. त्या नियमावलीनुसार  त्यात बदल करण्यात आला आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिली आहे. इतर राज्यातून येणाऱ्यांसाठी आर टीपीसीआर चाचणी बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. बाहेरुन राज्यात आलेले काही पेशंट पॉजिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळं आपण काळजी घ्यायला हवी,असेही ते म्हणाले..

मुलांचे आरोग्य महत्त्वाचे

राज्यात शाळांसाठी एक एकच नियम असावा.  जेव्हा १ डिसेंबरापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, हा नवीन विषाणू आला नव्हता. मात्र आता नवीन विषाणूचा धोका निर्माण झाल्यनंतर पुन्हा एकदा वर्षा गायकवाड याच्यासोबत आमचे बोलणे झाले आहे. गेल्या दीड वर्षापासून शाळा बदन आहेत.यात मुलांचेही आतोनात नुकसान झाले आहे, पण मुलांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे.

उदयोग धंदे पळवायला आलेत का ? इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे ते आपले उदयोग धंदे पळवायला आलेत असा अर्थ कसा निघेल. उदयोगपती हे त्यांना आवश्यक असलेलया पाणी, रास्ता, वीज यासारख्या पायाभूत सुविधा असतील तिथे जाण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काहीजन रेड कार्पेट टाकतात. काहीजण अतिरिक्त सवलती दिल्या जातात. यापूर्वीही तसेच झाले आहे. याबाबत राज्याचे प्रमुख , इंडस्ट्री डिपार्टमेंट तसा निर्णय घेऊ शकते. असेही ते म्हणाले.

तुटेपर्यंत ताणू नये

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना ते म्हणाले की राज्य सरकारने कुठेही तुटेपर्यत ताणलेल नाही. संपाबाबतची भूमिका परिवहन मंत्री अनिल परब नियमितपणे देत असतात. कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा मुद्दा ते सातत्याने मांडत आहेत . मात्र याबाबतची भूमिका सरकारने आता जाहीर केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेली पगारवाढ दिली आहे. जोपर्यंत त्रिसदस्यीय समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यामुळे यासगळ्या गोष्टीचा विचार एसटी कर्मचाऱ्यांनी करावा. अनेकांनी अजूनही टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सगळ्यानी सामोपचाराने मिटवून घ्यायला हवे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थिनीवर जीव जडला, नकारामुळे शिक्षकाकडून हत्या, नंतर मालगाडीसमोर उडी मारत आयुष्य संपवलं

‘एलिझाबेथ कोण?’ प्रश्नाचं उत्तर अखेर समोर येणार! थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर ‘बळी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

UP Election: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजप हिंदुत्वाच्या रथावर स्वार; पक्षाकडून अयोध्या, काशीनंतर मथुरेची तयारी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.