AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच, आम्ही जिंकलो”; ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांनी विश्लेषणच केलं…

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही पक्षीय लेबल लावलं जात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. हा दावा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच, आम्ही जिंकलो; ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांनी विश्लेषणच केलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 20, 2022 | 8:43 PM
Share

मुंबईः राज्यातील जवळ जवळ 7 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही या निवडणुकीत आम्हीच बाजी मारली असल्याचा दावा केला. त्याविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामपंचायतींची ही निवडणूक काटे की टक्कर होतीच. मात्र राज्यात जो सत्ताधारी असतो. तो पक्ष नेहमीच ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता आल्याचा दावा करत असतो. त्यांनी हा दावा केला असला तरी आमच्या पक्षानेही ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल हा पक्षीय लेबलवर अवलंबून नसतो. त्यामुळे विधानसभा, लोकसभा या निवडणुकांवर या निकालाचा काही एक परिणाम होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही पक्षीय लेबल लावलं जात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. हा दावा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असला तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही अनेक ग्रामपंचायतींवर यश मिळवले आहे. त्यामुळे एकाच पक्षाची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे असं म्हणणं चुकीचे आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी ग्रामपंचायत निकालाचे विश्लेषण करताना म्हणाले की, ग्रामपंचायतीवर ज्या प्रमाणे भाजप आणि शिंदे गटाची जशी सत्ता आली आहे. तशीच काही ग्रामपंचायतींवर आमच्या पक्षाचीही सत्ता आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आमचीच सत्ता आली असल्याचा दावा करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती