AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंना मंत्रीपद दिलं ते पटलं नाही, माजी शिलेदाराने आता डागली तोफ, अजून काय केले आरोप?

Bharat Gogawale on Aditya Thackeray : पाच वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्वात तरुण मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी त्याची खूप चर्चा ही झाली होती. राजकीय वारसा लाभल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडल्याचा दावा होता.

आदित्य ठाकरेंना मंत्रीपद दिलं ते पटलं नाही, माजी शिलेदाराने आता डागली तोफ, अजून काय केले आरोप?
आदित्य ठाकरे भरत गोगावलेImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 15, 2025 | 3:01 PM
Share

राज्यात पाच वर्षांपूर्वी राजकारणात वेगळाच प्रयोग झाला होता. महाविकास आघाडीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना सत्तेत वाटेकरी झाली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाले, तर आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात कॅबिनेटची माळ पडली होती. राज्यातील सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. त्यावेळी त्याची खूप चर्चा ही झाली होती. राजकीय वारसा लाभल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडल्याचा दावा होता. आता एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराने नेमका तोच धागा पकडून आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद द्यायला नको होतं असा सूर आळवला आहे.

2009 पासून आदित्य ठाकरे सक्रिय

आदित्य ठाकरे यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले आहे. मातोश्री हेच राजकीय केंद्र असल्याने त्यांचा राजकीय प्रवास तसा बालपणापासूनच झाला. सिनेटपासून अनेक निवडणुकीचा त्यांनी अगोदर अनुभव घेतला. 2009 मध्ये पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून त्यांना आमदारकी लढवण्याची संधी मिळाली . तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीत त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली होती.

भरत गोगावलेंची नाराजी

आदित्य ठाकरे यांना त्यावेळी शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. त्यावर भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते, असे मत गोगावले यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा, असा आरोप गोगावले यांनी केला.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.