धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, निष्कर्ष काढण्याची घाई करु नये : जयंत पाटील

आपण कोणीही निष्कर्ष काढण्याची घाई करण्याची गरज नाही,” असेही जयंत पाटील म्हणाले.  (Jayant Patil Comment On Dhananjay Munde rape accusations)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:57 PM, 14 Jan 2021

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत. याबाबत पक्षात चर्चा होत आहे. पोलिसांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पोलीस पोलिसांचं काम करतील,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. (Jayant Patil Comment On Dhananjay Munde rape accusations)

“धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जात होत. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्याबाबत पोलीस जे निष्कर्ष काढतील त्यानंतर आपण अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे. त्यापूर्वी आपण कोणीही निष्कर्ष काढण्याची घाई करण्याची गरज नाही,” असेही जयंत पाटील म्हणाले.

“त्यांनी यापूर्वीच एक महिला ब्लॅकमेल करण्याचे काम करते हे पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली होती. त्यामुळे याबाबत पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावीत एवढी अपेक्षा होती. पण ती उचलली नाही. शेवटी ते हायकोर्टात गेले. त्यांनी अर्ज दाखल केला आहे. याबाबतची प्राथमिक चौकशी करावी. एखादी महिला एखाद्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला बदनाम करत असेल, तर त्याचीही दखल घ्यावी,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

“पोलिसांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, पोलीस पोलिसांचं काम करतील. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा झाली नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.

पक्षप्रमुख म्हणून योग्य निर्णय घेऊ

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर बोलताना पक्षाशी चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलंय.णि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या पक्षनेत्यांची आज (14 जानेवारी) बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि धनंजय मुंडे या दोन प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं.  (Jayant Patil Comment On Dhananjay Munde rape accusations)

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार रोखठोक

Sharad Pawar on Munde | पक्ष म्हणून काळजी घ्यावी लागेल, तातडीने निर्णय घेऊ : शरद पवार