राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन ऐकताना, त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो: जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. (jayant patil on Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala)

राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन ऐकताना, त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो: जयंत पाटील
jayant patil
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 10:24 AM

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती गाईड सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी ते सर्व ऐकताना अंगावर तेव्हाही काटा आला होता आणि आजही लिहितानाही येतो आहे, असा अनुभव जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (jayant patil on Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala)

जयंत पाटील यांनी ट्विटवरून शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयीच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे, असं पाटील म्हणाले.

याच दिवशी स्वराज्याचा अरुणोदय झाला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि रयतेसाठी 6 जून हा आनंदाचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन. याच दिवशी महाराजांच्या नेतृत्वाखाली काळोखाचे तट कोसळून स्वराज्याचा अरुणोदय झाला. 2019 साली जानेवारी महिन्यात परिवर्तन यात्रेची सुरुवात रायगडावरून शिवाजी महाराजांना वंदन करून झाली. पक्षाच्या नेत्यांना गडावर येण्यास बराच अवधी होता म्हणून एका टुरिस्ट गाईडकडून गडाची माहिती घेतली. गाईडने गडाबाबत फार सखोल माहिती दिली असं सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती, असं ते म्हणाले.

हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण: मुख्यमंत्री

युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा, असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. (jayant patil on Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala)

संबंधित बातम्या:

PHOTO | शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, किल्ले रायगडावर नेत्रदीपक रोषणाई

महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्णक्षण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, अजित पवारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

उद्धव ठाकरे म्हणजे ‘ मॅटिनी मुख्यमंत्री’, वर्षभर मंत्रालयात पाय ठेवला नाही; भाजपची खोचक टीका

(jayant patil on Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.