AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTP न मागताच गाडीवर बस म्हणाला, सुनसान जागी नेलं अन्… ड्रायव्हरच हैवान बनला; तरुणीचा जीव कसा वाचला?

कल्याणमध्ये बाइक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. तिने आरोप केला आहे की बाइक चालक तिला सुनसान भागात घेऊन गेला. त्यानंतर चाकू दाखवून बलात्कार आणि लूटमार करण्याचा प्रयत्न केला.

OTP न मागताच गाडीवर बस म्हणाला, सुनसान जागी नेलं अन्... ड्रायव्हरच हैवान बनला; तरुणीचा जीव कसा वाचला?
Rapido Driver HarassmentImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 15, 2025 | 2:33 PM
Share

मुंबईतील ट्राफीक पाहाता आजकाल सर्वजण टॅक्सी किंवा कारने जाण्याऐवजी बाईकने जाणे पसंत करतात. ट्रॉफीकमध्ये अडकण्यापेक्षा बाईकवरुन लवकर ऑफिसला पोहोचू हा हेतूने आजकाल अनेकजण बाईकने जाणे पसंत करतात. बाइकही सुविधा देखील पुन्हा सुरु केली आहे. त्यामुळे अगदी कमी अंतरावर पटकन पोहोचता येते. पण आता याच बाइक सुविधेचा एका मुलीला वाईट अनुभव आला आहे. तिने स्वत:याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर ॲप-आधारित बाइक टॅक्सी सेवांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. कल्याणमधील एका तरुणीला जिमला जायचे होते, त्यासाठी तिने ॲपद्वारे बाइक बोलावली होती. मुलीने आरोप केला आहे की बाइक चालक तिला सुनसान भागात घेऊन गेला. त्यानंतर चाकू दाखवून तिच्यासोबत बलात्कार आणि लूटमार करण्याचा प्रयत्न करु लागला.

वाचा: मसूद अजहर ते एल चापो, तुरुंगात भुयार खोदून गेले पळून; भयानक दहशतवाद्यांची अंगावर काटा आणणारी स्टोरी!

घटना शनिवार संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन क्षेत्रात घडली. पीडितेने जिमला जाण्यासाठी एका ॲपद्वारे बाइक टॅक्सी बुक केली होती. आरोपी बाइक चालक सिद्धेश संदीप परदेशी (१९) तिला तिच्या घराजवळून घेऊन निघाला. मात्र, बुकिंगनंतर तरुणीच्या मोबाइलवर प्रवास सुरू करण्यासाठी चालकाकडून OTP विचारला होता. पण ड्रायव्हर गप्प राहिला. याच दरम्यान जेव्हा बाइक सिंधीगेट चौकाकडे जात होती, तेव्हा त्याने अचानक रस्ता बदलून बाइक सुनसान भागातील एका रिकाम्या इमारतीकडे वळवली.

चालत्या बाइकवरून उडी मारली

चालकाची संशयास्पद कृती ओळखून तरुणीने धैर्य दाखवले आणि चालत्या बाइकवरून उडी मारली. यात तिच्या पायाला दुखापत झाली, पण तिने हार मानली नाही. आरोपीने तिला अंधारात ओढत नेले आणि चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चालकाने तरुणीच्या गळ्यातील सोन्याचा आणि मोत्याचा हार तसेच सुमारे एक हजार रुपये रोख लुटले. एवढेच नव्हे तर आरोपीने एक स्प्रे कॅन दाखवून तिच्यावर आम्ल फेकण्याची धमकीही दिली, ज्यामुळे तरुणी आणखी घाबरली.

कसा वाचवला स्वत:चा जीव?

तरुणीने हिम्मत हारली नाही. तिने जोरदार विरोध केला. ती कशीबशी आरोपीच्या तावडीतून स्वतःला सोडवण्यात यशस्वी ठरली. ती घटनास्थळी जोरजोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपी बाइक चालकाला पकडले आणि त्याची मारहाण केली. त्यानंतर त्याला महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांच्या ताब्यात आरोपी

माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सिद्धेश संदीप परदेशीला अटक केली. पोलिसांच्या मते, आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.