AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काश फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम, शेकडो विद्यार्थ्यांना मदत

तळागाळातील समाजाला शिक्षणाप्रति प्रेरित करण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वाला स्मरून या वर्षीच्या आंबेडकर जयंतीचे अवचित्य साधून काश फाऊंडेशन या संस्थेतर्फे शेकडो विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काश फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम, शेकडो विद्यार्थ्यांना मदत
| Updated on: Apr 15, 2023 | 12:27 AM
Share

मुंबई : तळागाळातील समाजाला शिक्षणाप्रति प्रेरित करण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वाला स्मरून या वर्षीच्या आंबेडकर जयंतीचे अवचित्य साधून काश फाऊंडेशन या संस्थेतर्फे अनुसूचित जातींच्या विक्रमगड, पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ५०० शैक्षणिक पुस्तके छापुन वितरित करण्यात येणार आहेत. सदर पुस्तके विशेषतः मुलींसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ऊपयोगी ठरतील. मे २०२१ पासून काश फाऊंडेशन ही संस्था ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिला आणि मुली यांचे कुपोषण दूर करण्याच्या कामामध्ये कार्यरत आहे. काश फाऊंडेशनने आतापर्यंत अनेक वेळा आरोग्य शिबिरे, पोषक आहार, स्वेटर, फळ, कपडे इत्यादी चे वाटप या दुर्गम भागामध्ये केले आहे.

१४ एप्रिल २०२३ रोजी विक्रमगड, पालघर येथे वाटण्यात येणार्‍या ५०० पुस्तकांमुळे लिहिता आणि शिकता येईल. मुलींमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. १२, १३ एप्रिल २०२३ रोजी मुलींसाठी आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला. त्यामधे मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, अल्पवयातील विवाहामुळे होणारे शारिरीक नुकसान – सदर भागामध्ये १३ ते १५ वयातील मुलींचे विवाह केले जातात.

६०० sanitary napkin चे वाटप, १०० dettol packs आणि refill एकूण २०० packs आणि १०० refill packs अंगणवाडी शाळांसाठी. ६ biscuits असलेले ६० packets चे लहान मुलांना वितरण. ३६० bourbon biscuit packets, १२० packets लहान मुलांना. १५० detol soap packs आणि १५० napkins तरुण मुलींसाठी.

आपण किमान २ पुस्तके प्रकाशनाचा खर्च उचलून आपले योगदान देऊ शकता. तसेच हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवून त्यांनाही या विदायक कामासाठी प्रेरित करू शकता, असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे.

“चला ही आंबेडकर जयंती शिकण्याची आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या सदैव कल्पित मार्गावर चालण्याची देणगी देऊन साजरी करूया. आमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या: www.kaashfoundation.org आणि www.kaashcapd.com काही शंका असल्यास, तुम्ही आमच्याशी kaashfoundation@gmail.com वर संपर्क साधू शकता”, असं आवाहन संस्थेकडून करण्यात आलं आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.