AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai rains | “मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचे स्थलांतर करा” मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर टेवा. तसेच अतिधोकादायक इमारती, डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा असे आदेश ठाकरेंनी दिले.

Mumbai rains | मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचे स्थलांतर करा मुख्यमंत्र्यांचे आदेश
UDDHAV THACKERAY MEETING
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 8:47 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपत्कालीन विभागातील अधिकाऱ्यांसोबत घेतलेली महत्त्वाची बैठक संपली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढवा घेतला. यावेळी मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर टेवा. तसेच अतिधोकादायक इमारती, डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा असे आदेश त्यांनी दिले. (Keep rescue team on spot in Mumbai evacuate people from dangerous buildings ordered CM uddhav Thackeray)

संभाव्य आपत्तीबाबत ठाकरेंनी घेतला सविस्तर आढवा 

या बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त, पालिका अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, हवामान विभागाचे अधिकारी तसेच रेल्वे अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका क्षेत्रात शनिवराच्या (18 जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. विक्रोळीतदेखील अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. ही भीषण परिस्थिती पाहता ठाकरे यांनी महत्त्वची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबईची सध्याची परिस्थिती तसेच आगामी संभाव्य आपत्ती याबाबत ठाकरे यांनी सविस्तर आढवा घेतला. त्यानंतर ठाकरे यांनी मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा असे सांगितले. तसेच अतिधोकादायक इमारती तसेच डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्याचे नियोजन करा असेही आदेश ठाकरे यांनी दिले.

पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

दरम्यान, या बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच आगामी काही दिवसांमध्ये पावसाची स्थिती कशी असेल याबाबत सविस्तर सांगितले. या बैठकीत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मुंबई परिसरात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस असेल.

आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू

मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. या पावसाचा लोकल ट्रेनवरसुद्धा विपरित परिणाम झाला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. विक्रोळीतदेखील अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. या दोन्ही दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या :

“मुंबईतील भिंत पडून झालेले मृत्यू बीएमसीच्या बेपर्वाईचे निष्पाप बळी”, प्रविण दरेकरांची कारवाईची मागणी

Mumbai Rains: मुंबईत पावसाचं धुमशान; पालिकेने 10 तासांत उपसले तब्बल 442 कोटी लिटर पाणी!

महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

(Keep rescue team on spot in Mumbai evacuate people from dangerous buildings ordered CM uddhav Thackeray)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.