VIDEO: अर्जुन खोतकर यांचा मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी 100 एकर शासकीय जागा हडपण्याचा डाव; सोमय्यांनी टाकला बॉम्ब

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवा बॉम्ब टाकला आहे.

VIDEO: अर्जुन खोतकर यांचा मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी 100 एकर शासकीय जागा हडपण्याचा डाव; सोमय्यांनी टाकला बॉम्ब
kirit somaiya

मुंबई: शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्श आणि इमारतीसाठी 100 एकर जागा हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा हडपण्याचा घोटाळा सुरू आहे. खोतकरांना मॉल तयार करायचा आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि बिल्डिंगसाठी ही जागा हवी आहे, असं सोमय्या म्हणाले.

खोतकरांविरोधात आयकर विभागाकडेही तक्रार

सरकारने साखर कारखान्यासाठी जागा दिली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. सर्व मिळून 240 एकर जागा आहे. त्याची किंमत 1 हजार कोटी आहे. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला आहे. आयकर विभागालाही त्याची तक्रार केली आहे. आयकर विभागही बेनामी व्यवहाराचा तपास करणार आहे. मुळे आणि तपाडीया परिवार आणि सहआयुक्त नांगरे पाटील यांची पत्नी रुपालीताई यांचं नावही पुढे येत आहे. मुंबईच्या सहआयुक्तांना मी भेटलो होतो. या घोटाळ्याचा तपास मी सहआयुक्त होण्यापूर्वी बंद केला होता. कोर्टाला सीसमरी दिली होती. काहीच घोटाळा नाही, असं या सहआयुक्ताने सांगितलं. एका सहआयुक्तांनी दुसऱ्या सहआयुक्ताला सर्टिफिकेट दिलं, असं ते म्हणाले.

तुमची शिक्षा आईला नको, ईडीसमोर हजर राहा

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडी समोर हजर राहण्याचं आवाहन केलं. ईडीने भावना गवळी त्यांच्या घोटाळ्याबाबत जी चार्जशीट दाखल केली त्यात दोन लोकांची नावे आहेत. 69 कोटीची प्रॉपर्टी दोघांच्या नावाने दाखवण्यात आली आहे. सईद खान आणि भावना गवळीच्या आईच्या नावाने ही मालमत्ता दाखवली गेली आहे. या प्रकरणातील आरोपी सईद खान अटकेत आहे. भावना गवळीच्या मातोश्रीचं नाव चार्जशीटमध्ये आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी त्यांच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नये. त्यांनी ईडीसमोर हजर राहावे, असं आवाहन त्यांनी केलं.

शिवसेनेच्या 8 नेत्यांची चौकशी सुरू

त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या घोटाळ्याची मालिकाच सादर केली. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना औपचारिक अटक करण्यात आलेली आहे. प्रताप सरनाईक यांची 78 एकर जागा जप्त करण्यात आलेली आहे. संजय राऊतांनी 75 लाख परत केले आहेत. अनिल परब यांचा तपास सुरू आहे. इतर सेना नेत्यांविरोधात तक्रार केली आहे. त्याचाही तपास सुरू आहे. माफिया सेनेतील 8 मोठ्या नेत्यांची चौकशी करून कारवाई सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप ताणला जातोय? अजित पवार म्हणतात, उद्या कोतवाल, पोलीस पाटीलही पुढे येतील

IPL 2022: रोहित, विराट, धोनीचा ऑक्शनमध्ये सहभाग अशक्य, CSK, MI, DC, RCB, KKR कोणते खेळाडू रिटेन करणार?

शारीरिक संंबंधांनी कर्करोग बरा करण्याचा दावा, हॉटेलमध्ये डॉक्टर अर्धनग्नावस्थेत सापडला

Published On - 3:05 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI