देशमुखांना सीबीआयच्या जाळ्यात अडकवणाऱ्या जयश्री पाटील कोण आहेत?; वाचा सविस्तर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना 100 कोटींची वसुली करण्याचा आदेश दिल्याचा दावा केला होता. (know about Dr Jaishri Patil, the lawyer who filed petition against Anil Deshmukh)

देशमुखांना सीबीआयच्या जाळ्यात अडकवणाऱ्या जयश्री पाटील कोण आहेत?; वाचा सविस्तर
Jaishri Patil
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 1:03 PM

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना 100 कोटींची वसुली करण्याचा आदेश दिल्याचा दावा केला होता. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या आरोपानंतर अॅड. जयश्री पाटील यांनी देशमुखांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आणि कोर्टानेही या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. देशमुखांना सीबीआयच्या जाळ्यात ओढणाऱ्या या जयश्री पाटील कोण आहेत? त्यावर टाकलेला हा प्रकाश… (know about Dr Jaishri Patil, the lawyer who filed petition against Anil Deshmukh)

स्वातंत्र्य सैनिकाची कन्या

अॅड. जयश्री पाटील या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. या पदावर त्या सात वर्ष होत्या. मानवाधिकाऱ्याच्या मुद्द्यावर लढणाऱ्या वकील म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

कायद्यात पीएचडी

जयश्री यांनी कायद्यात पीएचडी केलेली आहे. त्यांचे वडील इंडियन कॉन्स्टिट्यूशनॅलिस्ट कौन्सिलचे सदस्य आहेत. जयश्री या गेल्या 22 वर्षांपासून कोर्टात प्रॅक्टिस करत आहेत.

मराठा आरक्षणाला विरोध

जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणालाही विरोध दर्शविला होता. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री यांच्यामाध्यमातून मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. जयश्री यांनी हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोधाचा मुद्दा लावून धरलेला आहे. जयश्री या गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत.

आज काय घडलं?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही. (know about Dr Jaishri Patil, the lawyer who filed petition against Anil Deshmukh)

पोलिसात तक्रार

दरम्यान, पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे,” अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली होती. या तक्रारीत त्यांनी शरद पवार यांचंही नाव लिहिलं होतं. (know about Dr Jaishri Patil, the lawyer who filed petition against Anil Deshmukh)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

Param Bir Singh Anil Deshmukh Live Updates | परमबीर सिंग यांच्या अनिल देशमुख यांच्या विरोधीतील याचिकेवर मुंबई हायकोर्टात काय घडलं?

(know about Dr Jaishri Patil, the lawyer who filed petition against Anil Deshmukh)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.