मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले ‘जम्बो’ कोव्हिड सेंटर ‘कुपोषित’, ICU बेड्सची वानवा, व्हेंटिलेटर्स धूळखात

मुख्यमंत्र्यांनीच उद्घाटन केलेल्या मुलुंड इथल्या कोव्हिड सेंटरमध्ये आयसीयू बेड्स, डायलॅसीस बेड्स (ICU and dialysis beds) उपलब्ध नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले 'जम्बो' कोव्हिड सेंटर 'कुपोषित', ICU बेड्सची वानवा, व्हेंटिलेटर्स धूळखात

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. अशाातच मुख्यमंत्र्यांनीच उद्घाटन केलेल्या मुलुंड इथल्या कोव्हिड सेंटरमध्ये आयसीयू बेड्स, डायलॅसीस बेड्स (ICU and dialysis beds) उपलब्ध नसल्याची गंभीर बाब सामोर आली आहे. उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्सही (ventilators) धूळखात पडून आहेत. त्यामुळे नावाला जरी ‘जम्बो’असली, तरी सोयी-सुविधांच्या बाबतीत ही कोव्हिड सेंटर्स ‘कुपोषित’ असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. (Lack of ICU and dialysis beds at Covid Center in Mulund)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत ठिकठिकाणी जम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते 7 जुलैला मुलुंडच्या एलबीएस मार्गावरही अशाच कोव्हिड सेंटरची उभारणा करण्यात आली. मुलुंड परिसरातील कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार व्हावा, त्यांना लवकर उपचार मिळावेत हा त्यामागचा उद्देश होता. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे.

या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन होऊन तीन महिने उलटले तरी आयसोलेशन बेड वगळता 215 आयसीयू बेड्स, 75 डायलॅसिस बेड्स अजूनही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. आयसीयू बेड्स 8 जूनपर्यंत उपलब्ध करुन देण्याचे आदेश होते. ते नसल्याने 74 व्हेंटिलेटर्सही धूळखात पडून आहेत. मुलुंड कोव्हिड सेंटरमधील हा भोंगळ कारभार समोर आल्याने मुंबईतील कोरोनाची भीषण परस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

हेही वाचा: Corona Update | मुंबईत 60% कोरोना मृत्यू झोपडपट्ट्यातील तर मुंबई कोरोना रुग्णांना बेड मिळना

जम्बो कोव्हिड सेंटरचा ‘शून्य उपयोग’ : भाजप

मुलुंडमधील कोव्हिड सेंटरची ही बाब समोर आल्याने भाजपने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. जम्बो कोव्हिड सेंटर्सचा काहीही उपयोग होत नसल्याचा आरोप, स्थानिक भाजप आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी केला.

“कोरोनाबधित रुग्णाला वेळेत उपचार मिळावे, त्याचा जीव वाचवा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोव्हिड सेंटरचे 7 जुलैला उद्घाटन केले. पण याचा काहीच उपयोग होत नाही” असा आरोपही कोटेचा यांनी केलाय.

दरम्यान एखाद्या रुग्णाला व्हेंटिलेटर किंवा आयसीयूची गरज लागली तर त्याला थेट सायन, जे.जे. किंवा इतर खासगी रुग्णालयांमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. याबाबत विचारले असता “सध्या बेड्स (ICU and dialysis beds) उपलब्ध नसले तरी लवकरच ते कार्यान्वित करण्यात येतील” असं बीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. पण पूर्व उपनगरात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना जम्बो कोव्हिड सेंटर्स हे फक्त नावालाच आहेत का? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जातोय.(Lack of ICU and dialysis beds at Covid Center in Mulund)

संबंधित बातम्या : 

मुंबई कोरोनामुक्त होण्यासाठी नेमके किती दिवस लागतील?

मुंबई महापालिकेचा कोरोनावर 1300 कोटींचा खर्च, पहिल्यांदाच बँकेतील ठेवींना हात

नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, पालिकेकडून युद्ध पातळीवर तयारी

मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढतोय, रुग्णवाढीची कारणं काय

Published On - 8:03 pm, Thu, 24 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI