AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार

[svt-event title=”राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार” date=”17/05/2019,10:49AM” class=”svt-cd-green” ] मुंबई: राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल […]

LIVE : राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

[svt-event title=”राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार” date=”17/05/2019,10:49AM” class=”svt-cd-green” ] मुंबई: राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 18 ते 21 मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”जाफर बांग्लादेशात क्रिकेटपटू घडवणार” date=”17/05/2019,9:34AM” class=”svt-cd-green” ] मुंबईचा वासिम जाफर बांग्लादेशात क्रिकेटपटू घडवणार, ढाक्यातील अकादमीसाठी वासिम जाफरचा करार [/svt-event]

[svt-event title=”इरफान विंडीजमध्ये खेळणार?” date=”17/05/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] वेस्ट इंडिजमधील T20 प्रीमियर लीगसाठी इरफान पठाणचेही लिलावाच्या यादीत नाव, मात्र BCCI कडून अद्याप मंजुरी नाही [/svt-event]

[svt-event title=”नाना पाटेकर यांना क्लीन चीट – तनुश्रीचा दावा” date=”17/05/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] नाना पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली नाही, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा दावा, क्लीन चीटबाबत अफवा पसरत असल्याचं स्पष्टीकरण [/svt-event]

[svt-event title=”कंझ्युमर फोरमचा महत्वपूर्ण निर्णय” date=”17/05/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] बिल्डरकडून घराचा ताबा देण्यास वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यास पैसे परत मागता येणार, कंझ्युमर फोरमचा महत्वपूर्ण निर्णय [/svt-event]

[svt-event title=”सहा दहशतवादी ठार” date=”17/05/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] जम्मूतल्या पुलवामा आणि शोपीयानमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैशच्या कमांडरसह सहा दहशतवादी ठार, एक जवान शहीद [/svt-event]

[svt-event title=”आणखी एक जवान हनी ट्रॅपमध्ये” date=”17/05/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] भारताचा आणखी एक जवान हनी ट्रॅपमध्ये, पाकिस्तानला महत्वपूर्ण माहिती दिल्याने जवान सुरक्षा दलाच्या ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्र भाजपनं बैठक बोलावली” date=”17/05/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] लोकसभेच्या निकालापूर्वी महाराष्ट्र भाजपनं बैठक बोलावली, लोकसभा निवडणुकीतल्या कामाचा आढावा घेणार, मुख्यमंत्र्यांसह रावसाहेब दानवे आणि सर्व उमेदवार, जिल्हा प्रमुखांना निमंत्रण [/svt-event]

[svt-event title=”मोदी बद्रिनाथचरणी लीन” date=”17/05/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] बंगालमध्ये रण गाजवल्यानंतर नरेंद्र मोदी बद्रीनाथचरणी, उद्या केदारनाथ तर परवा बद्रीनाथाचे दर्शन घेणार, तासभर मेडिटेशनही करण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”सोनिया गांधींनी समविचारी पक्षांची बैठक बोलावली” date=”17/05/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणूक निकालादिवशीच सोनिया गांधींनी समविचारी पक्षांची बैठक बोलावली, शरद पवारांनाही निमंत्रण, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रणनीती [/svt-event]

[svt-event title=”59 जागांसाठी रविवारी मतदान” date=”17/05/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकीत शेवटच्या 59 जागांवरचा प्रचार संपला, बंगालच्या 9 जागांसह मोदींच्या वाराणसीमध्ये रविवारी मतदान [/svt-event]

[svt-event title=”प्रज्ञा ठाकूरचा माफीनामा” date=”17/05/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] माफी मागायला टाळाटाळ करणाऱ्या प्रज्ञा ठाकूरला अखेर शहाणपण, नथुरामला देशभक्त म्हटल्याप्रकरणी स्पष्टपणे माफीनामा [/svt-event]

[svt-event title=”मनसेचं आंदोलन” date=”17/05/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात, ठाण्यात आज आंदोलन करणार, आंबा स्टॉलवरुन भाजपविरोधातील राड्यानंतर आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”राज्य सरकार अध्यादेश काढणार” date=”17/05/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकार अध्यादेश काढणार, निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील [/svt-event]

[svt-event title=”शाळेतील मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक” date=”17/05/2019,8:20AM” class=”svt-cd-green” ] पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक, गेल्या सहा महिन्यांपासून मुलींशी गैरवर्तणूक करत असल्याचा आरोप, विक्रम शंकर पोतदार असे नराधम शिक्षकाचे नाव, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीचा सर्वांत मोठा सौर प्रकल्प ” date=”17/05/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : राज्यातील महावितरण कंपनीचा सर्वांत मोठा सौर प्रकल्प लासलगावमध्ये सुरू, मुख्यमंत्री सौर कृषीवहिनी योजनेअंतर्गत 1.3 मेगावॉटचा सौर प्रकल्प, या प्रकल्पामुळे रात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी जाण्याची गरज नसल्याचा महावितरण कंपनीचा दावा, जिल्ह्यातील गिरणारे, वणी, वावी आश्वी खुर्द या चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार [/svt-event]

[svt-event title=”देशाची जनता चौकीदाराला धडा शिकवेल : आनंद परांजपे” date=”17/05/2019,8:05AM” class=”svt-cd-green” ] ठाणे : राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आणि ठाणे लोकसभा आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, कार्यकर्त्यांकडून ‘देश का चौकीदार चौर है’ अशा आगळ्यावेगळ्या केकची भेट, आनंद परांजपे यांनी केक कापून 23 मे रोजी देशाची जनता चौकीदाराला धडा शिकवेल असा विश्वास दर्शवला [/svt-event]

[svt-event title=”वऱ्हाडाचा अपघात, एकाचा मृत्यू” date=”17/05/2019,8:06AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपुर : वऱ्हाड घेऊन पतरताना अपघात, फोटोग्राफरचा मृत्यू, दहा वऱ्हाडी जखमी, चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु [/svt-event]

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.