भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं

Uddhav Thackeray On BJP : राम मंदिराच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा डिवचले आहे. आता भाजपमुक्त राम करण्याची वेळ आल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांनी अनेक विषयांवर सडेतोड मते मांडली. चौथ्या टप्प्याच्या अगोदर पुन्हा महाभारत सुरु झालं आहे.

भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं
भाजपमुक्त राम करणार
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 10:36 AM

राम मंदिराच्या मुद्यावर भाजपने काँग्रेससह विरोधी खेम्यावर मोठी टीका केली होती. जानेवारी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेवेळी विरोधक हजर नसल्याचा मुद्या भाजपने प्रकर्षाने मांडला होता. याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता भाजपमुक्त राम करण्याची वेळ आल्याचा टोला त्यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीच्या मध्यात उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. त्यात त्यांनी भाजपवर चौफेर हल्लाबोल केला.

टीकेला ठाकरे यांनी असे दिले उत्तर

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत, अशी टीका भाजप गोटातून करण्यात येते. त्याला ठाकरेंनी उत्तर दिले. मी त्यावेळी अयोध्येला गेलो नाही. याचं कारण मला काही मानपान पाहिजे होता असे नाही. उलट मोदींच्याही आधी मी तिथे गेलो होतो, असे ठाकरे म्हणाले

हे सुद्धा वाचा

दोनदा अयोध्येला गेलो

उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला कधी भेट दिली याचा उल्लेख करत, भाजपला उत्तर दिले आहे. “राममंदिराचा विषय तेव्हा थंड बस्त्यात पडलेला होता. साधारण नोव्हेंबर 2018 चा काळ होता. आपणही सोबत होतात. मी शिवसैनिकांना घेऊन अयोध्येत राममंदिरात गेलो होतो. त्या वेळी तिथे मंदिर नव्हतं. अयोध्येत जाऊन मी प्रभू रामाचं दर्शन घेतलं व ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा आपण दिली. शिवजन्मभूमीची एक मूठभर माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो. एक वर्षभरानंतर म्हणजे त्यानंतरच्या नोव्हेंबरमध्ये राममंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. त्यानंतर योगायोग असेल काही असेल, त्याच्या पुढच्याच महिन्यात ध्यानीमनी नसताना मी मुख्यमंत्री झालो. मुख्यमंत्री झाल्यावरही मी पुन्हा अयोध्येला गेलो.” असे ते म्हणाले.

तुमच्यासोबत भ्रष्टाचारी

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी भाजपसोबत भ्रष्टाचारी होते असा घणाघात ठाकरे यांनी घातला. राममंदिराची प्राणप्रतिष्ठा ठरली तेव्हा शंकराचार्यांनी त्यावर टीका केली. शंकराचार्यांना जरा नीट मान-सन्मानाने बोलवायला हवं अशी आमची भूमिका होती. तुमच्या बाजूला शंकराचार्य नव्हते. तर भ्रष्टाचारी होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपमुक्त राम करायचा आहे

राममंदिर प्राणप्रतिष्ठेवेळी अयोध्येला न जाता काळाराम मंदिरात पूजा का केली या प्रश्नावर ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला होता. हा राम माझासुद्धा आहे. हा राम म्हणजे कुणाची मक्तेदारी नाही. आज जी भाजपची मक्तेदारी होतेय… म्हणूनच तर मी ‘भाजपमुक्त राम’चा नारा दिला होता. भाजपमुक्त राम मला पाहिजे. हे सगळे जे आहेत, यांना मी जो शब्द वापरतो, बुरसटलेले गोमूत्रधारी… त्या विचारधारेची लोपं तेव्हा होती, त्यांच्याविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की, हा राम माझा आहे. माझासुद्धा आहे. राममंदिरात जाण्याचा मला अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेबांना राममंदिरात जाण्यापासून जे लोक अडवत होते, तेच आज माझ्यावरती टीका करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...