AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एटीएसला आणखी एक कार दमनमध्ये सापडली; वाझेंचे ‘कार’नामे उघड होणार?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसला अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. (maharashtra ats seized sachin waje car from daman)

एटीएसला आणखी एक कार दमनमध्ये सापडली; वाझेंचे 'कार'नामे उघड होणार?
सचिन वाझे
| Updated on: Mar 23, 2021 | 11:00 AM
Share

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसला अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. एटीएसने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंची आणखी एक कार जप्त केली आहे. एटीएसने थेट दमनमधून वाझेची वॉल्व्हो कार जप्त केली आहे. एक्सपर्टकडून या कारची तपासणी करण्यात येत असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (maharashtra ats seized sachin waje car from daman)

दमन येथे सापडलेली ही कार सचिन वाझेंच्या पार्टनरची असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एटीएसने दमन येथील एका फॅक्ट्रीत सोमवारी छापा मारला होता. तिथे त्यांना ही कार सापडली. दमनमध्ये सापडलेल्या या कारचा खरा मालक आणि वाझेच्या दरम्यानच्या कनेक्शनचाही एटीएस शोध घेत आहे. तर दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेला विनायक शिंदे हा अँटालिया स्फोटक प्रकरणातील एक आरोपी असल्याचं तपास यंत्रणेने स्पष्ट केलं आहे.

प्रिंटर तपासणीसाठी प्रयोगशाळेत

एनआयएने विनायक शिंदेच्या फ्लॅटमधून एक प्रिंटर जप्त केला आहे. धमकावणारे पत्रं लिहिण्यासाठी याच प्रिंटरचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. अँटालिया येथील स्फोटकांच्या कारमध्ये सापडलेलं पत्रं याच प्रिंटरद्वारे प्रिंट करण्यात आल्याचा एनआयएला संशय आहे. एनआयएने हा प्रिंटर जप्त करून चौकशीसाठी पाठवला आहे. तसेच सचिन वाझेच्या कार्यालयातून एक महत्त्वाची डायरीही एनआयएच्या हाती लागली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बनावट आधारकार्ड, पंचतारांकित हॉटेलात मुक्काम

वाझेंच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाझे बनावट आधारकार्ड दाखवून पंचतारांकीत हॉटेलात राहत होते. वाझेंकडून बनावट आधारकार्डही जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाझे 16 फेब्रुवारी रोजी हॉटेलात थांबले होते. त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएने जप्त केले आहेत. बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलात राहण्याचे कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.

हप्ते वसुलीची डायरी हाती?

वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे. (maharashtra ats seized sachin waje car from daman)

संबंधित बातम्या:

IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला; लेटरबॉम्बचा तपास करण्यास नकार

‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार

फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार

(maharashtra ats seized sachin waje car from daman)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.