Maharashtra News LIVE Updates : सुबोध जयस्वाल यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या समन्सला प्रतिसाद

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Updates : सुबोध जयस्वाल यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या समन्सला प्रतिसाद
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 22 Oct 2021 20:44 PM (IST)

  सुबोध जयस्वाल यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या समन्सला प्रतिसाद

  सीबीआय प्रमुख सुबोध जयस्वाल यांनी मुंबई पोलिसांच्या समन्सला प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्यांना समन्स पाठवले होते. तसेच सायबर सेलने बंद लिफाफ्यात प्रश्न देखील पाठवले होते. त्या प्रश्नानांनी जयस्वालांनी उत्तर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 • 22 Oct 2021 20:08 PM (IST)

  बारामतीत सैतानाचा अवतार समजून महिलेला नग्नपूजा करायला भाग पाडून बळी देण्याचा प्रयत्न

  बारामती :

  सैतानाचा अवतार समजून महिलेला नग्नपूजा करायला भाग पाडून बळी देण्याचा प्रयत्न
  बारामती तालुक्यातल्या करंजेपुल येथील खळबळजनक प्रकार
  मांत्रिकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
  अद्याप कोणालाही अटक नाही

 • 22 Oct 2021 18:56 PM (IST)

  दौरा अर्धवट सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक मुंबईकडे रवाना

  – दौरा अर्धवट सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक मुंबईकडे रवाना,

  – मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन आल्यानंतर अजित पवार तात्काळ मुंबईकडे गेल्याची सूत्रांची माहिती

  -अशोकनगरमधील जलतरण तलावाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अजितदादांनी केला आयत्या वेळी रद्द

  – उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून अजितदादा मुंबईकडे रवाना

 • 22 Oct 2021 18:49 PM (IST)

  मंत्री हसन मुश्रीफ अहमदनगरचं पालकमंत्रीपद सोडणार

  मंत्री हसन मुश्रीफ अहमदनगरचं पालकमंत्रीपद सोडणार,

  सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

 • 22 Oct 2021 18:44 PM (IST)

  परमबीर सिंह यांचा तपास सुरु, त्यांच्या निलंबनावर अद्याप निर्णय नाही : दिलीप वळसे पाटील

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  आज आढावा बैठक झाली
  बैठकीत सर्व प्रकारची चर्चा झाली
  परमबीर सिंह यांचा तपास सुरु
  परमबीरांच्या निलंबनावर अद्याप निर्णय नाही
  नवाब मलिकांची भेट घेऊ, त्यांनी तक्रार केल्यास दखल घेऊ, त्यांची सुरक्षा वाढवू

 • 22 Oct 2021 18:22 PM (IST)

  अनन्या पांडेची चौकशी संपली, तब्बल साडेतीन तास चौकशी

  अनन्या पांडेची चौकशी संपली, तब्बल साडेतीन तास चौकशी

  आर्यनसोबतच्या चॅट विषयी अनन्याची चौकशी

  साडेतीन तासांच्या चौकशीनंतर अनन्या एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली

  यावेळी ती आपल्या वडिलांसोबत घरी गेली

 • 22 Oct 2021 18:14 PM (IST)

  औरंगाबादच्या नागेश्वरवाडीत राहत्या घराला भीषण आग

  औरंगाबाद  :

  नागेश्वरवाडीत राहत्या घराला भीषण आग

  आगीत घरातील संसारउपयोगी साहित्य जळून खाक

  अग्निशमन दलाने आटोक्यात आणली भीषण आग

  आगीत कुठलीही जीवितहानी नाही

  भीषण आगीमुळे परिसरात पसरले होते भीतीचे वातावरण

 • 22 Oct 2021 18:12 PM (IST)

  अनिल गोटे यांचा बॅनरवर फोटो नसल्याने राष्ट्रवादीच्या दोन गटात रोहित पवारांसमोरच बाचाबाची

  धुळे – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे धुळे दौऱ्यावर आले असताना शहरातील पारोळा रोडवरील प्रकाश टॉकीज चौकात त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यात आमदार रोहित पवार यांच्या समोरच चांगली शाब्दिक चकमक झाली असून दोघेही कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

 • 22 Oct 2021 17:49 PM (IST)

  राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याच्या हालचाली, लवकरच पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता

  राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याच्या हालचाली

  पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यास शिक्षण विभागाचे अधिकारी अनुकुल

  शिक्षण मंत्र्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी शाळा उघडण्यास अनुकुलता दाखवली

   

 • 22 Oct 2021 17:44 PM (IST)

  एका बाजूला डाकू पार्टी, दुसऱ्या बाजूला माफियांची सेना : किरीट सोमय्या

  किरीट सोमय्या यांची अंबरनाथ येथील पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  एका बाजूला डाकू पार्टी, दुसऱ्या बाजूला माफियांची सेना

  माफियांना वाटलं धमक्या दिल्या तर घाबरतील

  जो संजय राऊत मला नौटंकीबाज म्हणायचा त्यांनीच मला पत्र पाठवलं आहे

  मला तर पत्राची वाचून चक्करच आली, म्हणून मी स्वतःला चिमटा काढून पहिला

  राऊत हे पवार आणि ठाकरेंचे प्रवक्ते, त्यामुळे ही पवारांची भाषा की ठाकरेंची?

  मी संजय राऊत यांना जाहीररीत्या धन्यवाद देतो

  राऊत यांनी यांच्या पत्रात माझं खूप कौतुक केलं आहे

  त्यांनी मला एक घोटाळा पाठवला, पण मी त्यांना २४ घोटाळ्यांची यादी देतो

  नवाब मलिक नेमके कोणाचे प्रवक्ते आहेत? ड्रग माफियांचे प्रवक्ते आहेत का?

  ड्रग माफिया पुढची पिढी बरबाद करतेय

  शाहरुख आणि त्याच्या मुलाबद्दल चिंता वाटते, फसला.. फसवला गेला

  नवाब मलिक, एखाद्या अधिकाऱ्यावर जर अशा पद्धतीने ड्रग माफियांचा प्रवक्ता बनून वैयक्तिक टीका करणार असाल, तर तुम्हाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल

  समीर वानखेडेचा बाल जरी बाका झाला ना तरी नवाब मलीकची खैर नाही

 • 22 Oct 2021 16:54 PM (IST)

  ठाणे महापालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाला प्रत्येकी 5 लाखांची मदत 

  ठाणे महापालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे आणि अंगरक्षकाला प्रत्येकी 5 लाखांची मदत
  मुख्यमंत्री सहायता निधीमधून होणार मदत
  काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येक पाच लाखांचे अर्थसहाय्य जाहीर झाले आहे.

  मुख्यमंत्री कार्यालयातून जिहाधिकारी ठाणे यांना पत्र प्राप्त झाले आहे.

 • 22 Oct 2021 16:40 PM (IST)

  प्रदूषणमुक्त भारत आपलं पुणे झालं तर लोकांची मन जिंकता येतील : अजित पवार

  अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  – आता ई बाईकचे शहर नावारूपाला आलं तर वावगं वाटायला नको, आणि ते येणारच

  – डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत

  – इलेट्रीक पीएमपी बसेस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे

  – सीएनजी किंवा इलेट्रिक बसेस घेण्याचा आमचा आदेश

  – भविष्याचा वेध घेतला पाहिजे
  – प्रदूषणमुक्त भारत आपलं पुणे झालं तर लोकांची मन जिंकता येतील
  – पुणेरी माणूस हा चौकस आणि बारकाईनं विचार करनारा असतो
  – प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहन येतायत, प्रदूषण होतंय
  – कोरोनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे
  – लोकं सांगतात कधीतरी इंधनाचा साठा संपणार आहे
  – फार स्पीडने जाऊ नका, हात पाय मोडून घेणार
  – मध्ये सुप्रिम कोर्टाने निकाल दिला आहे मात्र पुणेकर माहितीय कुणाचं ऐकतोय
  – राज्य सरकार केंद्र सरकारला इ बाईकला अनुदान देत असते
  – चौकस बुद्धीचा पुणेरी ग्राहक आहे
  – कितीही प्रश्न विचारेलत तरी शांतपणे त्याच्याशी बोला
  – लोकांना पटायला थोडा वेळ लागतो पण एकदा मनात बसले की पसरायला वेळ लागत नाही

 • 22 Oct 2021 16:34 PM (IST)

  समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारच्या 5 आलिशान गाड्या जप्त

  समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारच्या 5 आलिशान गाड्या जप्त

  राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मोतेवारच्या धनकवडी येथील बंगल्यात केली कारवाई

  जप्त केलेल्या गाड्यांमध्ये मिनी कूपर, पजेरो, मायक्रा, स्विफ्ट डिझायर अशा गाड्याचा समावेश

  समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारविरुद्धा 22 राज्यात 28 गुन्हे दाखल

 • 22 Oct 2021 15:53 PM (IST)

  पुण्यात टोळीयुद्ध भडकले, भरदिवसा दोन गँगमधील सराईत गुन्हेगारांची एकमेकांवर फायरिंग

  – पुण्यात टोळीयुद्ध भडकले,

  – भरदिवसा दोन गँगमधील सराईतांची एकमेकांवर फायरिंग,

  – अप्पा लोंढें गँगमधील संतोष जगतापसह तिघांची प्रकृती चिंताजनक,

  – पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील घटना

 • 22 Oct 2021 15:48 PM (IST)

  महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी भाजप नेत्यांनी एकत्र रणनीती आखली : रोहित पवार

  जळगाव : “सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे”, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज जळगावात केला. आमदार रोहित पवार हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात दुपारी दीड वाजता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

 • 22 Oct 2021 15:45 PM (IST)

  अतिक्रमण विरोधात कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाकूच्या सहाहाय्याने धमकविण्याचा प्रयत्न

  ठाणे महापालिकेच्यावतीने अतिक्रमण विरोधात कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाकूच्या सहाहाय्याने धमकविण्याचा प्रयत्न

  पालिका कर्मचारी यांना धमकावणे आणि चाकूचा धाक दाखवणे बाबत ठाणे महापालिका पोलिसात तक्रार दाखल करणार

  कारवाई दरम्यान काढलेल्या कडधान्य विक्रेत्यांचा फोटो आला समोर

  पातळी पाडा या ठिकानी पालिकेच्या वतीने पुन्हा फेरीवाला कारवाई सुरू

 • 22 Oct 2021 15:26 PM (IST)

  पुण्यात पर्यटकांची सिंहगडाला पसंती, आठ दिवसांत हजारो नागरिकांनी केला गड सर

  पुणे :

  – शहरातील पर्यटकांची सिंहगडाला पसंती,

  – आठ दिवसांत हजारो नागरिकांनी केला गड सर,

  – वनविभागातर्फे तब्बल 4925 वाहनांकडून एकूण 3 लाख 8 हजार 800 रुपये इतके शुल्क वसूल,

  – करोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटनावर बंदी घातली होती. तब्बल 18 महिने सिंहगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद होते,

  – या शुल्कात वाढ करून दुचाकीसाठी 50 रुपये, तर चारचाकीसाठी 100 रुपये आकारले जात आहे.

 • 22 Oct 2021 15:24 PM (IST)

  सरकार स्थिर आहे म्हणून आम्ही फिरतो : जयंत पाटील

  वसई : सरकार स्थिर आहे म्हणून आम्ही फिरतोय, सरकार अस्थिर असेल तर आम्ही मुंबईत राहून सरकार टिकविण्याचे आम्ही प्रयत्न केले असते. तशी आमच्यावर पाळी आलेली नाही, आमचे सरकार स्थिर आहे आणि आमचे तीनही पक्ष एकसंघपणाने काम करत आहेत, अशा शब्दात मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला.

 • 22 Oct 2021 14:48 PM (IST)

  महाविकास आघाडीने आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतलं नाही : राजू शेट्टी

  राजू शेट्टी यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  महाविकास आघाडी बनत असताना मी मुख्यमंत्र्यांचा सूचक होतो

  स्वाभिमानी ही मविआचा भाग आहे हे ते विसरले

  मविआनं आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतलं नाही

  राज्य सरकारने अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना मदतीचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही

  जर प्रश्न सुटत नसतील तर मी मविआवर का समाधानी असेल?

  राजू शेट्टी महाविकास आघाडीवर नाराज

  मविआवर राजू शेट्टींच टिकास्त्र

 • 22 Oct 2021 14:36 PM (IST)

  नवाब मलिक यांना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

  कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना आज सकाळी ७ वाजता जीवे ठार मारण्याच्या धमकीचा काॅल, नवाब मलिक यांच्या बाॅडीगार्डने उचलला होता काॅल

  – राजस्थानहून आला काॅल, समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत, त्यांच्या विरोधात बोलणं बंद करा अन्यथा महागात पडेल अशी धमकी

  – नवाब मलिक यांना यापूर्वीही आल्या आहेत फोन काॅलवर अनेक धमक्या, धमक्या वारंवार येत असल्याने नवाब मलिक यांच्या घरी सुरक्षा वाढवली

 • 22 Oct 2021 14:26 PM (IST)

  अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात पोहोचली

  अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात पोहोचली

  आर्यन खानसोबतच्या चॅटबद्दल एनसीबी चौकशी करणार

  अनन्याी आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

 • 22 Oct 2021 14:22 PM (IST)

  येत्या पाच वर्षांत वर्ध्याच्या पोर्टमध्ये 50 हजार तरुणांना नोकरी मिळणार : नितीन गडकरी

  नितीन गडकरी यांच्या भाषणातील मुद्दे :

  – वर्धा जिल्ह्यातील शिंदी ड्रायपोर्ट एमओयू सायनिंग कार्यक्रम

  – ड्रायपोर्टच्या रुपाने आपण समुद्र वर्ध्यात आणलाय

  – या ड्रायपोर्टवरुन आयात निर्यात वाढणार

  – या ड्रायपोर्टवर कस्टम इथेच होणार

  – नागपूरात १२५ आरामशीन आहे, यातील ७५ टक्के लाकूड आयात होतं

  – लॅाजीस्टीक कॅपीटल बनवण्याची ही सुरुवात आहे

  – ड्रायपोर्टमधून नागपूरी संत्रा निर्यात होणार

  – वर्धा जिल्हयात निर्यातक्षम उद्योग उभे व्हावेत

  – मिहानमध्ये ५६ हजार लोकांना रोजगार मिळालाय. दोन तीन वर्षांत एक लाख लोकांना नोकरी मिळणार

  – पाच वर्षांत वर्ध्याच्या पोर्टमध्ये ५० हजार जणांना नोकरी मिळणार

  – ड्रायपोर्टमघ्ये मुंबईचा व्यापारी मोठी गुंतवणूक करणार आणि आपले लोक भाषण देणार की विदर्भ मागे राहिला

  – ड्रायपोर्टमघून विदर्भातील शेतमाल निर्यात करणार, माशांची निर्यात वाढणार

  – विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुलांना काम मिळणार

  – नागपूर ते हैदराबाद नवीन महामार्ग बनवणार आहेत

 • 22 Oct 2021 12:22 PM (IST)

  मुंबईतील करी रोडच्या अविघ्न टॉवरला भीषण आग

  avighna park Fire

  avighna park Fire

  मुंबईतील करी रोडच्या अविघ्न टॉवरला भीषण आग
  करी रोडमधील अविघ्न टॉवरला भीषण आग
  अग्निशमन दलाच्या 15 गाड्या दाखल
  आगीचं कारण अस्पष्ट
  अनेक फ्लॅटमधलं फर्निचर जळून खाक
  धुराचे उंचच उंच लोट
  अविघ्न 60 मजली इमारत
  17 ते 25 मजल्यादरम्यान आग
  अग्रिशमन दलाचे अधिकारी दाखल
  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल

   

 • 22 Oct 2021 12:20 PM (IST)

  जरंडेश्वरवर बोलताना अजित पवार काय म्हणाले?

  जरंडेश्वर बद्दल माझ्या नातेवाईकांचा उल्लेख केला जातो. मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे. सुंदरबन कोऑपरेटिव्ही सोसायटी ने उच्च न्यायालायत याचिका दाखल केली होती. नंतर BVG च्या हनुमंत गायकवाड यांनी तो कारखाना चालवला त्यांना तोटा आला म्हणून त्यांनी दुसऱ्या कंपनी ला विकला. त्यावर उच्च न्यायालयाने आदेश केले त्यावर जरंडेश्वर सहकारीने नोटीस ऑफ मोशन move केली. 3 महिन्यात पैसे भरण्याचे आदेश दिले पण भरता आले नाही म्हणून एमएससी बँकेने कारखाना ताब्यात घेतला.

 • 22 Oct 2021 12:16 PM (IST)

  जरंडेश्वरचा मालक कोण?, सोमय्यांच्या सवाल, अजित पवारांनी आता उत्तर दिलं!

  हनुमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर मिल काढली. त्यांचं कुटुंब त्यात होतं. त्यांना त्या वर्षी तोटा आला. त्यामुळे त्यांनी तो कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवायला दिला. तो कारखाना दुसरी कंपनी चालवत आहेत. सुंदरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने जरंडेश्वरच्या लिलावाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

 • 22 Oct 2021 12:13 PM (IST)

  कारखान्यांच्या खरेदी विक्रीचा अजित पवारांचा लेखाजोखा मांडला

  राज्यभरातील कारखान्यांच्या खरेदी विक्रीचा लेखाजोखा अजित पवार यांनी आज पुण्यात मांडला. राज्यभरातील साखर कारखान्यांची खरेदी किती पैशात केली आणि विक्री किती रुपयांत केली, याचा लेखाजोखा अजित पवार यांनी मांडला.

 • 22 Oct 2021 12:11 PM (IST)

  एक म्हणतो 25 हजार कोटींचा घोटाळा, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा, खोटं बोलून दिशाभूल करु नका : अजित पवार

  साखर कारखान्यांच्या बाबतीत विविध जण अनेक आरोप करतायत. एक म्हणतो 25 हजार कोटींचा घोटाळा, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा आहे. खोटी आकडेवारी सादर करुन दिशाभूल करण्याचं काम विरोधकांकडून सुरु आहे. पण मला तुम्हाला सांगायचंय, मी आज सगळी कागदपत्रे घेऊन आलोय. विविध चौकशी यंत्रणांनी चौकशी करुन झालीय. त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाही, असं चोख प्रत्युत्तर अजित पवार यांनी विरोधकांना दिलं.

 • 22 Oct 2021 12:03 PM (IST)

  कारखान्यांबाबत सगळी कागदपत्रं घेऊन आलोय, पण चौकशीनंतर काहीच निष्पन्न झालं नाही : अजित पवार

  आज मी सगळी कागदपत्रं घेऊन आलोय
  अनेक यंत्रणांनी सारख कारखान्यांची चौकशी केली
  कारखान्यांच्या व्यवहारांचं पवारांकडून तपशीलवार वाचन
  किती कारखाने विकले गेले याचं वाचन
  चौकशीनंतर काहीच निष्पन्न झालं नाही
  25 हजार कोटींना कारखाना विकला गेला, हा आरोप खोटा
  मागील सरकारच्या काळात विकले गेलेले कारखान्यांची यादी अजित पवार यांनी वाचून दाखवली
  जिल्हा बँक राज्य सहकारी बँकेने विकलेले कारखाने
  3 कोटी 36 लाखाला विकत घेतलेला कारखाना
  साखर कारखान्यांत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला, हा आरोप खोटा
  खोटी आकडेवारी सादर करुन आरोप केले जातायत
  विविध साखर कारखाने किती किमतीला विकले गेलेत, याचं वाचन अजित पवार यांनी केलं.

 • 22 Oct 2021 12:00 PM (IST)

  अजित पवारांना NCB चा प्रश्न विचारताच, म्हणाले, उगाच कोणाची नाव घ्यायची का?

  सध्या एनसीबी अॅक्शन मोडमध्ये आहे. मुंबईत ड्रग्ज केसचा तपास सुरु आहे. यामध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या घडामोडी घडत आहेत. अजित पवारांना याच विषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता,  उगाच कोणाची नाव घ्यायची का? तथ्य असले तर कारवाई करा ना, असं ते म्हणाले.

 • 22 Oct 2021 11:56 AM (IST)

  नवाब मलिक यांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले

  नवाब मलिक यांच्या प्रश्नावर अजित पवार भडकलेले पाहायला मिळाले. मला नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत जसा मला प्रेस घेण्याचा अधिकार आहे, तसाच नो कमेंट्स म्हणण्याचाही अधिकार आहे, असं म्हणत अजित पवार पत्रकारांवर भडकले. मलिक आणि वानखेडे यांच्याबद्दल त्यांचे त्यांचे प्रश्न त्यांनाच विचारा. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं अजित पवार म्हणाले.

 • 22 Oct 2021 11:53 AM (IST)

  कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही, पुणेकरांनो काळजी घ्या

  कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असेल तरीही त्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

 • 22 Oct 2021 11:51 AM (IST)

  पुणेकरांची दिवाळी सुरमयी होणार, दिवाळी कार्यक्रमाला परवानगी

  गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण राज्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावर बंधने आलेली होती. मात्र, आता ही बंधने शिथील होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.

 • 22 Oct 2021 10:55 AM (IST)

  परमवीर सिंग यांच्या प्रकरणातील चौकशी आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे आला नाही, त्यानंतरच पुढचं पाऊल- वळसे पाटील

  परमवीर सिंग यांच्या प्रकरणातील चौकशी आयोगाचा अहवाल अजून राज्य सरकारकडे आला नाही एकदा चौकशी आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे आला की त्यानंतर परमवीर संदर्भात पुढची कारवाई केली जाईल

  रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात कोणत्या प्रकरणात त्यांना आरोपी करायचं की नाही यासंदर्भात हा न्यायालयीन विषय असल्यामुळे न्यायालयात उत्तर दिले जाईल
  दिलीप वळसे पाटील

  नवाब मलिक यांची NCB विभागा संदर्भात तक्रार आहे असे दिसते त्यामुळे तिच्या विभागाबद्दल बोलत आहे

 • 22 Oct 2021 10:37 AM (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठकीला सुरवात

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरवात

  कौन्सिल हॉल मध्ये आयोजित करण्यात आलीये आढावा बैठक

  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिकेचे नगरसेवक, विविध मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त उपस्थित

 • 22 Oct 2021 10:00 AM (IST)

  नागपूर महापालिकेसाठी भाजपचं मिशन ‘नव मतदार’, युथ वॉरिअर्सच्या माध्यमातून संपर्कावर भर!

  नागपूर महापालिकेसाठी भाजपचं मिशन नवं मतदार

  युथ वॉरिअर्सच्या माध्यमातून संपर्कावर भर

  प्रभाग निहाय जबाबदारी चे वाटप

  बूथ पातळीवर युथ वारीअर्स नेमण्यास सुरवात

  नव्याने मतदानास पात्र ठरलेल्या मतदारांशी युथ वारीयर्स साधणार संवाद

  भाजप ची 15 वर्ष पासून महापालिकेत असलेली सत्ता कायम ठेवण्यासाठी सुरू आहे तयारी

 • 22 Oct 2021 08:44 AM (IST)

  अनन्या पांडे आणि आर्यनमध्ये काय व्हॉट्स अॅप चॅट झालं? आज एनसीबीकडून सखोल तपास…

  अनन्या पांडे आणि आर्यन खानच्या मध्ये झालेल्या वाॅट्सएप चॅट्सचा आज एनसीबीकडून होणार सखोल तपास…

  – या दोघांच्या चॅट्समध्ये ड्रग्ज एंगलचा एनसीबीकडून आज तपास केला जाणार…

  – काल अनन्याची दोन तास चौकशी झाली आजही समीर वानखेडे अनन्याची चौकशी करणार आहे…

  – अनन्या पांडे आणि आर्यन खान हे खूप चांगले आणि जूने मित्र आहेत…

  – आर्यन खान हा ड्रग्ज घेत होता हे माहीत होतं का, होतं तर कधी पासून माहीत होतं… कधी कुठल्या पार्टीत त्याने ड्रग्ज घेतलं होतं का?, या आणि अशा अनेक अंगांनी आज तपास होण्याची दाट शक्यता…

  – वाॅट्सऐप चॅट व्यतिरिक्त अनन्याविरोधात एनसीबीकडे कोणताच ठोस पुरावा नाही, त्यामुळे तपासावर सगळ्यांच्या नजरा…

  – अनन्या पांडे यांच्या बांद्रा निवासस्थानी सध्या शांतता…

  – साधारण १० वाजता अनन्या पांडे एनसीबी कार्यालयाला जाण्यासाठी निघणार आहे

 • 22 Oct 2021 08:42 AM (IST)

  आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय, नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली : अजित पवार

  उपस्थित सर्व कलाकार बंधु भगिनींनो
  आज वेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलोय,
  निसर्गापुढे काही चालत नाही,
  19 महिने हे सगळं बंद होतं, कलाकार सारखे भेटायचे प्रश्न विचारायचे,
  आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय आहे
  मात्र मी घंटा वाजवली
  सगळे कलाकार विचारतायेत,
  दिवाळीनंतर आम्ही बघतोय,
  तिसरी लाट येऊ नये म्हणून आम्हाला खबरदारी घ्यावी लागते,
  आम्हाला बंद करायला आवडत नाही
  मात्र खबरदारी घेतली पाहिजे …
  अमित देशमुखांवर याची जबाबदारी आहे,
  मला लोकांना कशी मदत करता येईल त्याला जास्त निधी द्यावा लागतो
  दिवाळीनंतर भेटा, 100 टक्के क्षमतेचा विचार करू
  मी महापौरांना भेटेन याबाबत चर्चा करेन
  100 टक्के क्षमतेनं सुरू करण्याला आम्ही परवानगी देणार

 • 22 Oct 2021 08:39 AM (IST)

  कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव अधिकाऱ्यांवर भडकले

  कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव अधिकाऱ्यांवर भडकले

  सोयगाव तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर भडकले हर्षवर्धन जाधव

  निराधार महिलांच्या मोर्चात हर्षवर्धन जाधव यांनी अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी

  निराधार महिलांच्या मोर्चाचे निवेदन स्वीकारायला अधिकारी वेळेवर ना आल्यामुळे भडकले हर्षवर्धन जाधव

  निराधार महिलांना पेंशन आणि सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे काढला होता मोर्चा

 • 22 Oct 2021 07:56 AM (IST)

  आजपासून राज्यभरातील नाट्यगृहात तिसरी घंटा वाजणार, पुण्यात अजित पवारांच्या हस्ते पुजन, शिंदेशाही पगडी घालून दादांचा सन्मान

   

  आजपासून राज्यभरातील नाट्यगृहात तिसरी घंटा वाजणार,

  पुण्यात अजित पवारांच्या हस्ते पुजन,

  शिंदेशाही पगडी घालून दादांचा सन्मान

  अजित पवारांचा नाट्य परिषद आणि कलाकारांच्या वतीनं सन्मान,

  तलवार देऊन केलं स्वागत

 • 22 Oct 2021 07:52 AM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

  88 कोटीतून बांधलेल्या न्यायालयाच्या अद्यायावत इमारतीचे करणार उद्घाटन..

  सर न्यायाधीश एन व्ही रमण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री किरण रिजाजु हे राहणार उपस्थित..

  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील विस्तारित प्रशासकीय इमारतीचे उद्या साडेदहा वाजता होणार लोकार्पण..

  कोरोना प्रतिबंध नियमांची घेतली जाणार काळजी

 • 22 Oct 2021 07:22 AM (IST)

  शेतकरी तरुणाचं हृदय नागपूरवरुन मुंबईला, अवयवदानाने चौघांना जीवनदान

  शेतकरी तरुणाचं हृदय नागपूरवरुन गेले मुंबईला

  – बैतुलच्या तरुणाच्या अवयवदानाने चौघांना जीवनदान

  – अपघातात मेंदूमृत विजय घंगारेंच्या अवयवदानाने चौघांना जीवनदान

  – विजये हृदय मुंबईतील १८ वर्षीय तरुणाला दान करण्यात आले

  – मानवतावादी दृष्टिकोनातून विजयच्या कुटुंबीयांनीचा अवयवदानाचा निर्णय

  – वर्षातले दहावे अवयवदान

  – नागपूर विभागात आतापर्यंत ७७ मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान

 • 22 Oct 2021 07:22 AM (IST)

  ऊर्जामंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांची वीज कापली

  – ऊर्जामंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांची वीज कापली

  – रब्बी हंगामाच्या तोंडावर महावितरणची कारवाई

  – नापीकीच्या संकटात आता वीज नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात

  – नापीकी आणि अतिवृष्टीच्या संकटात महावितरणमुळे आणखी भर

  – ९२ हजार कृषीपंप कनेक्शन ४५० कोटींच्या बिलाची थकबाकी

 • 22 Oct 2021 07:21 AM (IST)

  सोलापुरातील ग्रामीण भागातील निर्बंध आजपासून हटवले

  सोलापुर- ग्रामीण भागातील निर्बंध आजपासून हटवण्यात आले

  ग्रामीण भागातील दुकाने रात्री 11 तर हॉटेल व रेस्टॉरंटस् रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार

  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

  कोरोना रुग्ण संख्या घटत चालल्याने जनजीवन येत आहे पूर्वपदावर

 • 22 Oct 2021 07:20 AM (IST)

  राज्यभरातील नाट्यगृह आजपासून उघडली जाणार

  राज्यभरातील नाट्यगृह आजपासून उघडली जाणार,

  पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अजित पवारांच्या हस्ते वाजणार नाट्यगृहाची तिसरी घंटा,

  अजित पवारांच्या हस्ते होणार नाट्यगृहाचं पुजन

 • 22 Oct 2021 07:19 AM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार
  आज सकाळी 10 वाजता देशातील नागरिकांना संबोधित करणार
  पीएमओने ट्विट करत दिली माहिती

 • 22 Oct 2021 07:01 AM (IST)

  तू इधर उधर की बात न कर, ये बता कि काफिला क्यू लूटा : संजय राऊत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI