अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात नाही, कारण काय?, अर्थसंकल्प 11 मार्च रोजी

यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार आहे. नागपूरमध्ये हे अधिवेशन होणार नाही. तशी माहिती आज सरकारकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. त्यांना प्रवास करण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात नाही, कारण काय?, अर्थसंकल्प 11 मार्च रोजी
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात नाही, कारण काय?, अर्थसंकल्प 11 मार्च रोजी
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 6:17 PM

मुंबई: यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (maharashtra budget session 2022) मुंबईतच (mumbai) होणार आहे. नागपूरमध्ये (nagpur) हे अधिवेशन होणार नाही. तशी माहिती आज सरकारकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. त्यांना प्रवास करण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यामुळे ते नागपूरला जाऊ शकत नाही. म्हणून हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. येत्या 3 मार्च रोजी हे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे त्यावर भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचं आश्वासन काँग्रेस नेत्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा हे अधिवेशन मुंबईलाच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, येत्या 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

राज्याचं प्रत्येक हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनापूर्वी आजारी पडले. त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केलं होतं. त्यामुळे नागपूरला अधिवेशन घेण्याऐवजी मुंबईतच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुढचं अधिवेशन नागपुरात घेणार असल्याचं सरकारकडून विरोधकांना आश्वासन दिलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने आता हे अधिवशेन मुंबईतच घेण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

सन 2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut: महाराष्ट्र हा गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊत गर्जले

Sanjay Raut Press Conference LIVE : संजय राऊतांची वादळी पत्रकार परिषद, कुणावर बाण, कुणाशी सामना?

Maharashtra News Live Update : सिंधुदुर्गात भाजपात मोठी दुफळी, निवडणुकीनंतर मोठा झटका

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.