सर्वात मोठी गुड न्यूज, मुंबईजवळच्या ‘या’ शहरातील कोरोनाची लाट ओसरली?

राज्यासह देशावर कोरोना महामारीचं (Corona Pandemic) भयानक संकट आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय (Corona second wave fade in two cities of Maharashtra).

सर्वात मोठी गुड न्यूज, मुंबईजवळच्या 'या' शहरातील कोरोनाची लाट ओसरली?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 6:36 PM

ठाणे : राज्यासह देशावर कोरोना महामारीचं (Corona Pandemic) भयानक संकट आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने त्यांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या आहे. या साऱ्या घटना ताज्या असताना मुंबईजवळ असलेल्या दोन शहरांमधून सकारात्मक बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath) आणि बदलापूर (Badlapur) शहरांमध्ये दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं हे द्योतक म्हणावं लागेल (Corona second wave fade in two cities of Maharashtra).

अंबरनाथ बदलापूरमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने कमी

अंबरनाथ शहरात 1 एप्रिल रोजी 172 नवे रुग्ण आढळले होते. तर 1 मे रोजी हा आकडा 132 वर आला. तसेच 10 मे रोजी हाच आकडा अवघ्या 53 वर आला. बदलापूरमध्येही 1 एप्रिल रोजी 177 नवे रुग्ण आढळले होते. 1 मे रोजी ही संख्या 148 इतकी होती. तर 10 मे रोजी ही संख्या 57 वर आली. त्यामुळे या दोन्ही शहरातली रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचं पाहायला मिळत असून दुसरी लाट ओसरत असल्याचं हे सकारात्मक चित्र आहे.

तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना सुरु

मात्र असं असलं, तरी लवकरच तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जातोय. ही लाट लहान मुलांसाठी जीवघेणी ठरण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या मधल्या काळात शांत न बसता लहान मुलांसाठी विशेष हॉस्पिटल आणि आयसीयू उभारण्याचं काम अंबरनाथ पालिकेनं हाती घेतलंय. तसंच नागरिकांनी सुद्धा पूर्वीप्रमाणेच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय (Corona second wave fade in two cities of Maharashtra).

केडीएमसीत कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात

अंबरनाथ, बदलापूर जवळ असलेल्या कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचं थैमान अद्यापही सुरुच आहे. दररोज शेकडो नागरिकांना अद्यापही कोरोनाची बाधा होत आहे. याशिवाय मृत्यूची संख्याही वाढली आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यात कल्याण डोंबिवलीतही रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कल्याण डोंबिवलीतील रुग्णसंख्या ही दिवसाला 2 हजारांच्या पार गेली होती. रुग्णांना बेड मिळणं कठीण होऊन बसलं होतं. मात्र, राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर संसर्ग रोखण्यात यश आल्याचं चित्र आहे.

मुंबईतही कोरोनाची रुग्णसंख्या घटली

अंबरनाथ, बदलापूर या शहरांप्रमाणे मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं चित्र आहे. गेल्या महिन्यात मुंबईत आठ ते अकरा हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, ही रुग्णसंख्या घटवण्यात मुंबई महापालिका प्रशासनाला यश आलं आहे. मुंबईत सध्या दिवसाला एक ते तीन हजाराच्या आत नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट, हाय ॲलर्ट जारी, अरबी समुद्राकडे टाँकटाइ वादळाची आगेकूच

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.