AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने कोरोना रुग्णसंख्येचे शिखर गाठले काय ? आता आलेख घसरणार ? आरोग्यमंत्रालयाचं म्हणणं आहे…

मे महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांपैकी पाच दिवस 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण मिळाले. (india corona second wave corona patient death)

भारताने कोरोना रुग्णसंख्येचे शिखर गाठले काय ? आता आलेख घसरणार ? आरोग्यमंत्रालयाचं म्हणणं आहे...
Covid 19 bodies
| Updated on: May 11, 2021 | 5:47 PM
Share

मुंबई : देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. मे महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांपैकी पाच दिवस 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण मिळाले. पण 7 मे पासून रुग्णसंख्येत रोजच्या रोज घट होतेय. (detailed analysis of India second wave of Corona and Corona patient death rate)

देशभर घटतेय रुग्णसंख्या

मंगळवारी सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासांत 3 लाख 29 हजार 942 नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये कर्नाटकातून सर्वाधिक 39 हजार 305 रुग्ण तर महाराष्ट्रातून 37 हजार 236 रुग्ण आहेत. या दोन राज्यांशिवाय केरळ, उ.प्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, प.बंगाल, छत्तीसगड, हरयाणा, म.प्रदेश आणि बिहार अशी आठ म्हणजे एकूण 10 राज्यांतले 70% रुग्ण आहेत. आरोग्यमंत्रालयानंच ही अधिकृत आकडेवारी आज सकाळी दिली. मे महिन्याच्या 11 दिवसांतच 38 लाख 18 हजार 186 रुग्णांची नोंद झालीय. गेल्या आकरा दिवसांतली आकडेवारी अशी आहे.

उपचाराधीन रुग्ण घटले

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन महिन्यात कधी पाहायला मिळाली नाही एवढी घट आज दिसून आली. ही घट 30 हजार 16 रुग्ण इतकी असून गेल्या 61 दिवसांतली ती निच्चांकी आहे. 37 लाख 15 हजार 221 इतके रुग्ण सध्या देशभर उपचार घेतायत. आतापर्यंत बाधित झालेल्यांच्या तुलनेत ही संख्या 16.16% इतकी आहे.

सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.75%

सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासांत 3 लाख 56 हजार 082 रुग्ण बरे झाले. म्हणजे 3 लाख 29 हजार 942 इतक्या नव्या रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 26 हजार 140 ने तो जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचा देशभरातला दर सध्या 82.75% इतका आहे.

मे महिन्यात 37,871 मृत्यू

24 तासांत 3,876 रुग्णांचा देशभरात मृत्यु झाला. यातले 596 कर्नाटकात आणि 549 महाराष्ट्रातले मृत्यु आहेत. वर उल्लेख केलेल्या 10 राज्यांमध्येच 73.09% मृत्यु झालेले आहेत. मे महिन्याच्या 11 दिवसांत देशभरात 37871 रुग्णांचा मृत्यु झालाय. रोज सरासरी साडे तीन ते चार हजारांपर्यंत मृत्यु होतायत.

INDIA CORONA DEATH

INDIA CORONA DEATH

आतापर्यंत 13.28% लसीकरण

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच जण लसीकरणावर जोर देतायत, पण लसीच्या तुटवड्यामुळे त्याला मर्यादा पडतायत. लसीकरणाच्या 115 व्या दिवशी म्हणजे 10 मे रोजी देशभरात 25 लाख 3 हजार 756 लोकांना लस देण्यात आली. आतापर्यंत 17 कोटी 27 लाख 10 हजार 066 लोकांना आतापर्यंत लस देण्यात आलीय. देशाची लोकसंख्या 130 कोटी जरी गृहीत धरली तर 13.28% लोकसंख्येचं लसीकरण झालंय असं म्हणता येईल.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : उल्हासनगरमध्ये दुकाने बाहेरून बंद, आतमध्ये ग्राहकांची गर्दी, कडक कारवाई होण्याची शक्यता

Goa Oxygen leakage : नाशिकनंतर गोव्यात धक्कादायक घटना, रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती

(detailed analysis of India second wave of Corona and Corona patient death rate)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.