Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 40,956 नवे कोरोनाबाधित, तर 71,966 रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

 • Updated On - 11:11 pm, Tue, 11 May 21 Edited By: Chetan Patil
Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 40,956 नवे कोरोनाबाधित, तर 71,966 रुग्णांना डिस्चार्ज
corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 11 May 2021 22:48 PM (IST)

  ठाणे शहरात दिवसभरात 723 नवे रुग्ण

  ठाणे :

  # आज 723 रुग्ण कोरोनातून झाले बरे
  # आज 290 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 1,24,801 इतकी आहे
  # आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 1,17,866 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 94.4% इतकं आहे )
  # 5,151 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत
  # आज 8 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,784 जणांचा मृत्यू झाला

  # मागील 24 तासात एकूण 4,260 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 290 ( 6.81% ) कोरोना बाधित झाले आहेत

 • 11 May 2021 22:44 PM (IST)

  सांगली जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 1373 नवे कोरोनाबाधित

  सांगली कोरोना अपडेट :

  जिल्ह्यात आज दिवसभरात 1373 कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 29 रुग्णाचा मृत्यू

  जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 2707 वर

  ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 17071 वर

  तर उपचार घेणारे 1265 जण आज कोरोना मुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 73687 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 93435 वर

 • 11 May 2021 21:42 PM (IST)

  राज्यात दिवसभरात 40,956 नवे कोरोनाबाधित, तर 71,966 रुग्णांना डिस्चार्ज

  राज्यात आज 40956 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 71966 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 4541391 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 558996 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.67% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 • 11 May 2021 21:24 PM (IST)

  अंबरनाथमध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्तास स्थगित

  अंबरनाथ :

  अंबरनाथमध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्तास स्थगित

  45 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना आधी लस देणार

  त्यातही ज्यांचा दुसरा डोस असेल, त्यांना प्राधान्य मिळणार

  अंबरनाथच्या ऑर्डनन्स हॉस्पिटल लसीकरण केंद्रावर लस मिळणार

 • 11 May 2021 21:23 PM (IST)

  विरारच्या आरोग्य केंद्रात अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

  विरार : विरारच्या आरोग्य केंद्रात लसीकरणावरुन अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी चार जणांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज वसई विरार शहरात लसीकरण सुरु होतं. विरारच्या रानले तलाव येथील समन्वय नागरी आरोग्य केंद्रात दुपारी पावणे दोनच्या सुमारास चार जण आले आणि लसीकरण केंद्रातील अधिकारी आणि स्टाफ यांच्याशी हुज्जत घालू लागले. तुम्ही पार्शलीटी करता, आमचे लोक घेत नाहीत, काम बंद करा, असं म्हणून अंगावर धावून, शिवीगाळ आणि धमकी दिली. सरकारी कामात अडथळा प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात भादसे कलम 353 अन्वये मारुती उर्फ सनी पेडणेकर, चेतन चव्हाण, धनाजी पवार, भरत उर्फ मोहन सिंग अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 • 11 May 2021 21:20 PM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 676 नवे रुग्ण

  उस्मानाबाद कोरोना अपडेट :

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 676 रुग्ण, 11 मृत्यू तर 743 जणांना डिस्चार्ज

  उस्मानाबाद तालुका 187, तुळजापूर 59,उमरगा 56, लोहारा 60, कळंब 78, वाशी 68, भूम 96 व परंडा 72 रुग्ण

  25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
  26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
  27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
  28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
  29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
  30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
  1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
  2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
  3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
  4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
  5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
  6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
  7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
  8 मे – 628 रुग्ण – 11 मृत्यू
  9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
  10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
  11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू

  उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6622 सक्रिय रुग्ण

  उस्मानाबाद – 2 लाख 48 हजार 853 नमुने तपासले त्यापैकी 46 हजार 207 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 35.59 टक्के

  38 हजार 528 रुग्ण बरे 81.93 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

  रुग्णांचा मृत्यू 1057 तर 2.30 टक्के मृत्यू दर

 • 11 May 2021 21:19 PM (IST)

  सोलापुरात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू, 1687 नवे कोरोनाबाधित

  सोलापूर-

  सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून आज कोरोनाचे 1687 रुग्ण

  तर  60 जणांचा कोरोनाने मृत्यू

  ग्रामीण मध्ये 2478 तर शहरात 225 असे 2703 आज जण आज कोरोनातुन मुक्त

  ग्रामीण भागातील1547 जण कोरोनाचे नवे रुग्ण तर 49 जणांचा मृत्यु

  शहरातील 140  जणांचा अहवाल पोजिटिव्ह  तर  11जणांचा मृत्यू

 • 11 May 2021 20:45 PM (IST)

  नागपूर शहरात 45 वर्षे वयोगटावरील नागरिकांचे बुधवारी फक्त 3 केंद्रावर लसीकरण होणार

  नागपूर –

  45 वर्षे वयोगटावरील नागरिकांचे बुधवारी फक्त 3 केंद्रावर लसीकरण होणार

  18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही

  नागपूर शहराकरीता कोव्हॅक्सिन लसींचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील 45 वर्षावरील नागरिकांचे दुसरे डोmचे लसीकरण बुधवारी फक्त तीन केंद्रावर होणार आहे.

  अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती

 • 11 May 2021 20:07 PM (IST)

  मालेगावकरांना मोठा दिलासा, दिवसभरात आढळले फक्त 6 नवे कोरोनाग्रस्त

  मालेगाव : मालेगावकरांना मोठा दिलासा

  आज सापडले कोरोनाचे फक्त 6 नवीन रुग्ण

  मालेगावमधील कोरोना रुग्ण संख्या हळूहळू होत आहे कमी

  सक्रिय रुग्णांमध्येसुद्धा होतेय घट

  दहा दिवसांत आढळून आले रुग्ण-531

  दहा दिवसात झालेले मृत्यू-32

  मालेगावात एकूण रुग्णसंख्या-11964

  एकूण कोरोनामुक्त-10197

  एकूण मृत्यू-277

  सक्रिय रुग्ण-1490

 • 11 May 2021 20:04 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 2404 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 3468 रुग्णांना डिस्चार्ज

  पुणे कोरोना अपडेट

  पुण्यात दिवसभरात 2404 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – दिवसभरात  3468 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधीत 76 रुग्णांचा मृत्यू, 24 रूग्ण पुण्याबाहेरील.

  – 1399 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 415133

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 29702

  – एकूण मृत्यू -7461

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 412970

   

 • 11 May 2021 20:00 PM (IST)

  नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली, 2187 नवे रुग्ण, 5385 जण कोरोनामुक्त

  नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली

  – दिवसभरात 2187 रुग्ण पॉझिटिव्ह तर तब्बल 5385 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  – मृत्यूदर मात्र चिंताजनकच,आज 38 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

  – जिल्ह्यातील मृतांचा आकडा 4 हजारवर

  – उद्यापासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनलोड प्रतिसाद द्या, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन

 • 11 May 2021 19:41 PM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 500 रुग्णांची नोंद, आठ जणांचा मृत्यू

  गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

  आज वाढलेले रुग्ण – 500

  आज झालेले मृत्यू – 08

  आज बरे झालेले – 559

  तालुकानिहाय रुग्णसंख्या

  गोंदिया————–164

  तिरोडा————–30

  गोरेगाव————–46

  आमगाव————–49

  सालेकसा————-74

  देवरी——————83

  सडक अर्जुनी ———–14

  अर्जुनी मोरगाव——–37

  इतर राज्य————–03

  एकूण रुग्ण – 38046

  एकूण मृत्यू – 611

  एकूण बरे झालेले – 33433

  एकूण उपचार घेत असलेले – 4002

 • 11 May 2021 19:12 PM (IST)

  सातारा जिल्ह्यात 1072 रुग्ण कोरोनामुक्त, 1621 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

  सातारा जिल्ह्यात 1072 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात 1621 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

  जिल्हयात आज 45 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

  जिल्ह्यात सध्या 23,042 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

  सातारा जिल्ह्यात एकूण 2962 कोरोना रुग्णांचा मृत्यु

  जिल्ह्यात एकूण 1,01146 रुग्ण कोरोनामुक्त

 • 11 May 2021 18:54 PM (IST)

  कल्याण डोंबिवलीत म्युकर मायकोसिसचा शिरकाव, 2 जणांचा मृत्यू

  कल्याण डोंबिवलीत म्युकर मायकोसिसचा शिरकाव

  म्युकर मायकोसिसमुळे कल्याण डोंबिवलीतील 2 जणांचा मृत्यू

  डोंबिवलीतील एम्स या खासगी रुग्णालयात होते 8 रुग्ण

  म्युकर मायकोसिस आजारामुळे एका 69 वर्षीय वयोवृद्ध बाजीराव काटकर आणि 38 वर्षीय तुकाराम भोईर यांचा मृत्यू

  केडीएमसी आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांची माहिती

 • 11 May 2021 17:46 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 467 नव्या रुग्णांची नोंद  

  वाशिम कोरोना अलर्ट

  जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

  जिल्ह्यात आज एका रुग्णाचा मृत्यू

  दिवसभरात 467 नव्या रुग्णांची नोंद

  दिवसभरात 680 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 11 दिवसात 45 रुग्णांचा मृत्यू

  तर एकूण अकरा दिवसांत 5653 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  दिवसभरात 5197 जण कोरोनामुक्त

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 33013

  सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4320

  आतापर्यंत एकूण रुग्णांना डिस्चार्ज – 28351

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 341

 • 11 May 2021 17:42 PM (IST)

  नागपूर जिल्ह्यात 6725 जणांनी केली कोरोनावर मात

  नागपूर : जिल्ह्यात आज 6725 जणांनी केली कोरोनावर मात

  2243 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  तर 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  एकूण रुग्णसंख्या – 453848

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 398994

  एकूण मृत्यू संख्या – 5258

 • 11 May 2021 17:03 PM (IST)

  उल्हासनगरमध्ये दुकाने बाहेरून बंद, आतमध्ये ग्राहकांची गर्दी, कडक कारवाई होण्याची शक्यता

  उल्हासनगर :उल्हासनगरच्या गजानन मार्केट परिसरात दुकानदारांची छुपी दुकानदारी उघड

  कपड्यांच्या दुकानांना परवानगी नसतानाही गजानन मार्केट परिसरात दुकानं उघडी

  शटर बाहेरून बंद, मात्र आतमध्ये ग्राहकांची गर्दी

  पोलिसांनी धाड टाकत एकाच दुकानातून तब्बल 80 जणांना काढलं बाहेर

  कोरोना वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाईची आवश्यकता

 • 11 May 2021 16:31 PM (IST)

  रत्नागिरीत लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच, लस घेण्यासाठी लोकांची रेटारेटी

  रत्नगिरी- रत्नागिरीत लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच

  रत्नागिरीतल्या मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी तोबा गर्दी

  लस घेण्यासाठी लोकांची रेटारेटी

  उन्हाच्या तडाख्यात लस मिळण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी

  पोलिसांना करावं लागलं पाचारण, पोलीस कमांडोंनासुद्ह बोलवावं लागलं

  पंचेचाळीस वर्षावरील लसीकरणाचा होता दुसरा डोस

 • 11 May 2021 16:24 PM (IST)

  बारामतीतील लॉकडाऊन आणखी सात दिवसांनी वाढवला

  बारामती : बारामतीतील लॉकडाऊन आणखी सात दिवसांनी वाढवला

  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 5 ते 11  मे पर्यंत होता लॉकडॉऊन

  आज झालेल्या बैठकीत आणखी सात दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

  किराणा आणि भाजीपाला घरपोच देण्यास मुभा

  प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली माहिती

 • 11 May 2021 16:22 PM (IST)

  गोवा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा टँक लीक, आरोग्य प्रशासनाची धावपळ

  गोवा हॉस्पिटलमध्ये गंभीर घटना

  ऑक्सिजनचा टँक लीक

  टँक लीक होण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही

  ऑक्सिजन वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

 • 11 May 2021 16:02 PM (IST)

  18 वर्षावरील लोकांच्या लसीकरण विलंबाला पूर्णत: राज्य सरकार जबाबदार

  मुंबई : राज्य सरकारच्या लसीकरण मोहिमेवरुन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गंभीर टीका केली आहे. त्यांनीे  18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला जो विलंब होत आहे. त्याला  सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील असं म्हटलंय. तसेच राज्य सरकार 50 टक्के लस खरेदी करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हातात चेक आहे असं सांगितलंय. मग ते चेक काय वटत नाहीत ? किती लस बूक केल्या, किती जणांना पैसे दिले, हे त्यांनी सांगावं, असा घणाघातसुद्धा त्यांनी केला.

 • 11 May 2021 15:22 PM (IST)

  अमरावती जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा आजाराचा शिरकाव

  अमरावती –

  अमरावती जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा आजाराचा शिरकाव

  जिल्ह्यात कोरोना नंतर आढळले म्युकरमायकोसीसचे रुग्ण

  अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकरमायकोसीसचा दहा रूग्णांवर उपचार सुरू

  जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांची माहिती

  अमरावती जिल्हात खळबळ

 • 11 May 2021 15:08 PM (IST)

  अमरावती जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव, 10 रुग्णांवर उपचार सुरु

  अमरावती : जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

  जिल्ह्यात कोरोनानंतर आढळले म्युकर मायकोसिसचे रुग्ण

  अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकर मायकोसिसच्या दहा रूग्णांवर उपचार

  जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांची माहिती

  अमरावती जिल्हात खळबळ

 • 11 May 2021 15:01 PM (IST)

  मीरा भाईंदरमध्ये लसींचा तुटवडा, 13 पैकी 10 लसीकरण केंद्र बंद

  मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत लसीच्या तुटवडा असल्याने 13 पैंकी 10 लसीकरण केंद्र बंद आहे. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात असलेल्या लसीकरण केंद्रावर लस घेण्याकरीता नागरिकांचा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळपासून नागरिक या लसीकरण केंद्रावर जमले आहे..शहरात फक्त तीन ठिकाणी लसीकरण सुरु आहे. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात असलेल्या लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील तसेच नाजर्थ स्कुल आणि हैदरी चौक येथे 45 पेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे.

 • 11 May 2021 14:46 PM (IST)

  कोरोनावावर प्रभावी इंजेक्शन तयार, सांगलीतील आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचा दावा

  कोल्हापूर –

  कोरोनावावर प्रभावी इंजेक्शन तयार

  सांगली जिल्ह्यातील शिराळा इथल्या आयसेरा बायोलॉजीकल कंपनीचा दावा

  अँटिकोव्हिड सिरम नावाने इंजेक्शन तयार,घोड्याच्या रक्तातील ऍन्टीसेरा काढून तयार केले इंजेक्शन

  इंजेक्शनची प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा

  मानवी प्रयोगासाठी आता कंपनीला आयसीएमआर च्या परवानगी ची प्रतीक्षा

  खासदार धैर्यशील माने यांच्या कडून ही परवानगी साठी प्रयत्न सुरू

 • 11 May 2021 14:45 PM (IST)

  छत्तीसगड राज्यातील जंगलात पण पोहोचला कोरोना

  छत्तीसगड राज्यातील जंगलात पण पोहोचला कोरोना

  छत्तीसगड राज्यातील नक्षल दलम च्या अनेक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण

  छत्तीसगड राज्यातील बस्तर क्षेत्रात 400 नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची एक माहिती समोर आलेली आहे

  त्यात काल दहा नक्षलवाद्यांच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती

  या नक्षलवाद्यांना कोरोनावर मात करण्यासाठी जंगलाच्या बाहेर येणे आवश्यक

  कोरोनाची लागण झाल्यामुळे नक्षलवाद्यांची अनेक दलम चिंताग्रस्त

  बिजापूर सुकमा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांनी सभा आयोजित केली होती या सभेत जवळपास चारशे नक्षलवादी होते

  या सभेतून असं कोरोनाची लागण अनेक नक्षलवाद्यांना झाल्याचे वृत्त समोर आले आहे

 • 11 May 2021 13:07 PM (IST)

  धक्कादायक, म्युकरमायकोसिस आजाराने राज्यात पहिला मृत्यू?

  धक्कादायक, म्युकरमायकोसिस आजाराने राज्यात पहिला मृत्यू?

  कल्याण डोंबिवलीत म्युकरमायकोसिस आजारी एन्ट्री

  डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात सहा रुग्ण

  म्युकरमायकोसिस आजारामुळे एका 69 वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू

  मयत व्यक्तीचे नाव बाजीराव काटकर

  मयत व्यक्तीचा मुलगा वैभव काटकर याची माहिती

  या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाचा काही बोलण्यास नकार

 • 11 May 2021 13:05 PM (IST)

  औरंगाबाद बसस्थानकावर लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून एसटी कर्मचाऱ्यांनी साजरा केला वाढदिवस

  औरंगाबाद –

  औरंगाबाद बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी साजरा केला वाढदिवस

  लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून साजरा केला वाढदिवस

  सहकारी कर्मचाऱ्यांची गर्दी जमवत केला वाढदिवस साजरा

  वाढदिवसाला कर्मचाऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकारीही उपस्थित

  थेट बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर केक कापून केला वाढदिवस साजरा

  वाढदिवस साजरा करण्यासाठी 20 ते 25 कर्मचाऱ्यांनी केली बसस्थानकात गर्दी

 • 11 May 2021 12:52 PM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील चापाणेर लसीकरण केंद्रावर उडाला गोंधळ, कोरोना लसीकरणासाठी उसळली तुफान गर्दी

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यातील चापाणेर लसीकरण केंद्रावर उडाला गोंधळ

  कोरोना लसीकरणासाठी उसळली तुफान गर्दी

  गर्दीला आवरताना नागरिक आणि प्रशासनामध्ये उडाला गोंधळ

  लसीकरणासाठी तुफान गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टशिंगचा उडाला फज्जा

  कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वादावादी

  लस कमी असल्यामुळे नागरिक आणि प्रशासनात उडाला गोंधळ

 • 11 May 2021 12:32 PM (IST)

  राज्यात फक्त ३५ हजार कोवॅक्सिन उपलब्ध – राजेश टोपे

  राजेश टोपे –

  राज्यात फक्त ३५ हजार कोवॅक्सिन उपलब्ध

  राज्यात १ कोटीहून जास्त नागरिकांचं आतापर्यंत लसीकरण करण्यात आलं आहे

  पण लसीच्या पुरवठ्याअभावी राज्यात १८-४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लांबणीवर

  ३८ रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाईल

  राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या कमी झाली आहे

  राज्यात म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढले, त्यामुळे तातडीने उपचार करणे महत्त्वाचे

  महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत म्युकर मायकोसिसचा उपचार मोफत होणार

  म्युकर मायकोसिससाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांना औषधं महाग होत असेल तर सरकारतर्फे मोफत औषध पुरवण्याचा प्रस्ताव आहे

  महत्त्वाचा निर्णय – आयएमएच्या मागणीनुसार, डॉक्टरांच्या खाजगी क्लिनिकच्या नोंदणी रिन्युअलसाठी सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे

  रेमडेसीव्हीरसाठी राज्याचे प्रयत्न सुरु, तीन लाख कुप्यांसाठी जागतिक निविदा देण्यात आल्या आहेत

  लसीसाठी सर्वांना ऑफर दिलीये, मात्र त्यांच्याकडून रिस्पॉन्स आलेला नाही

  लसीची उपलब्धता हाच अडचणीचा विषय

   

   

 • 11 May 2021 11:13 AM (IST)

  बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाबाधितांची संख्या होतेय कमी

  बारामती :

  – बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी

  – कोरोना बाधितांची संख्या होतेय कमी

  – बारामतीत आज १९० जणांना कोरोनाची लागण

  – काल दिवसभरात १०९३ जणांची झाली तपासणी

  – ३५० जणांचा तपासणी अहवाल प्रतिक्षेत

  – बारामतीतील एकूण रुग्णसंख्या २०८०४ वर

  – काल दिवसभरात ३२० जण कोरोनामुक्त

  – तर कालच्या दिवसात १० जणांचा मृत्यू

 • 11 May 2021 11:01 AM (IST)

  औरंगाबादेत जिल्हा रुग्णालयातील बंद ऑक्सिजन प्लांटची भाजप करणार पूजा

  औरंगाबाद –

  जिल्हा रुग्णालयातील बंद ऑक्सिजन प्लांटची भाजप करणार पूजा

  15 दिवसांपासून तयार झालेला ऑक्सिजन प्लांट सुरू न केल्यामुळे भाजपकडून प्लांटची पूजा

  औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आले आहे ऑक्सिजन प्लांट

  ऑक्सिजन प्लांट तयार होऊनही सिलेंडर द्वारे वापरला जातोय ऑक्सिजन

  ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी भाजप करतंय पूजा आंदोलन

 • 11 May 2021 11:01 AM (IST)

  सोलापूर शहराजवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रावर शहरातील लोक लसीकरणासाठी गर्दी करत असल्याच्या तक्रारी

  सोलापूर –

  शहराजवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रावर शहरातील लोक लसीकरणासाठी गर्दी करत असल्याच्या तक्रारी

  महानगरपालिकेच्या हद्दीतील लोक ग्रामीण भागात जाऊन लस घेत असल्याच्या तक्रारी

  लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून आता लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून स्लिपा देण्यात येणार

  ग्रामीण भागातील निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियोजन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश

 • 11 May 2021 11:00 AM (IST)

  लासलगाव येथे भाजीपाला मंडाईत नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी

  लासलगाव

  – लासलगाव येथे भाजीपाला मंडाईत नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी

  – कोरोनाचा नागरिकांना विसर का?

  – उद्यापासून जिल्ह्यात 22 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असल्याने भाजीपाला खरेदीसाठी तोबा गर्दी

  – लासलगाव ग्रामपंचायत व पोलिसांचे जणू बुजून दुर्लक्ष का असा ही तोबा गर्दी पाहून पडला प्रश्न

 • 11 May 2021 10:59 AM (IST)

  नांदगाव शहारत सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

  मनमाड –

  नांदगाव शहारत सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

  उद्यपासून जिल्ह्यात कडक लॉक डाऊन लागणार असल्याने किराणा सह इतर समान खरेदी करण्यासाठी नांदगाव शहरातील प्रमुख बाजार पेठेत नागरिकांनी केली गर्दी

  सामान खरेदी करतांना नांदगाव करांना कोरोना चा विसर

  सोशल डिस्टनसिंग चा उडाला फज्जा

  नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाचा मात्र दुर्लक्ष

 • 11 May 2021 10:46 AM (IST)

  भांडूपच्या वॅक्सिनेशन सेंटरच्या उद्घाटनाला संजय राऊत पोहोचले

  – भांडूपच्या वॅक्सिनेशन सेंटरच्या उद्घाटनाला पोहोचले संजय राऊत

  – आमदार सुनिल राऊत यांच्या मतदार संघात वॅक्सिनेशन सेंटरचं उद्घाटन

  – दुसऱ्या वॅक्सिनसाठी मोठी रांग लागली, रांगेत अनेक वयोवृद्ध उभे

  – अनेक जण रजिस्ट्रेशन न करताच आले, अनेकांचे ४५ दिवस पूर्ण झाले

  – दुसरा डोझ सुरू झाल्याने नागरीकांची मोठी रांग

 • 11 May 2021 09:27 AM (IST)

  अजब दुनियेचा गजब कारभार, स्वॅब न देताच महिला निघाली कोरोना पॉझिटिव्ह

  सिंधुदुर्ग –

  अजब दुनियेचा गजब कारभार, स्वॅब न देताच महिला निघाली कोरोना पॉझिटिव्ह, कुडाळमधील धक्कादायक प्रकार उघड, कुडाळ येथील कोविड सेंटरमध्ये स्वॅब देण्यासाठी गेलेल्या महिलेने रजिस्ट्रेशन केले मात्र काही कारणास्तव स्वॅब न देताच माघारी गेली, तरीही त्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह दाखविण्यात आला, भाजपची कुडाळ तहसीलदारांकडे चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

 • 11 May 2021 09:26 AM (IST)

  सोलापूर जिल्ह्यात 113 दिवसात 3 लाख 25 हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस

  सोलापूर –

  113 दिवसात जिल्ह्यात 3 लाख 25 हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस

  42 लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर जिल्ह्यात अद्याप 38 लाख नागरिक अशा प्रतीक्षेत

  हीच गती कायम राहिल्यास लसीकरण मोहिमेसाठी एक वर्ष लागणार

  आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही ,मात्र ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केलेल्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस देण्यात येणार

  राज्यालाच कोरोना  प्रतिबंधक लसीचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने पहिला डोस घेतलेल्या अनेकांना दुसरी मात्रा घेण्यासाठी करावे लागतेय प्रतीक्षा

 • 11 May 2021 08:18 AM (IST)

  नाशिक महापालिका आयुक्त बोलावणार शहरातील सर्व बालरोग तज्ञांची बैठक

  नाशिक – संभाव्य तिसरी लाट रोखण्याचा प्रयत्न

  आज महापालिका आयुक्त बोलावणार शहरातील सर्व बालरोग तज्ञांची बैठक

  तिसऱ्या लाटेतील उपाययोजनांचा होणार विचार

  शहरातील नियोजनाबाबत होणार बैठकीत चर्चा

 • 11 May 2021 08:12 AM (IST)

  औरंगाबादेत पुन्हा लसींचा तुटवडा, औरंगाबादेत फक्त एक दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा

  औरंगाबाद –

  औरंगाबादेत पुन्हा लसींचा तुटवडा

  औरंगाबादेत फक्त एक दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा

  अनेक दिवसांपासून औरंगाबादेत सुरू आहे लसींचा तुटवडा

  56 केंद्रांऐवजी फक्त 21 केंद्रावरच होणार लसीकरण

  लसींच्या तुटवड्यामुळे औरंगाबादेत लसीकरणात अडथळे

 • 11 May 2021 08:12 AM (IST)

  नाशकात लॉकडाऊन काळात यंदा दंडासह दंडुक्याचा वापर देखील होणार

  नाशिक – लॉकडाऊन काळात यंदा दंडासह दंडुक्याचा वापर देखील होणार

  आधी समज दिला जाणारा अन्यथा दंडुक्याचा वापर केला जाणार

  पोलीस आयुक्तांच स्पष्टीकरण

  शहरात 40 ठिकाणी नाकेबंदी असणार

  विना कारण फिरणाऱयांची या लॉक डाऊन मध्ये गय नाही

  पोलोस आयुक्त दीपक पांडये यांची माहिती

 • 11 May 2021 08:11 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविड सेंटरला भासतोय औषधांचा तुटवडा

  कोल्हापूर

  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविड सेंटरला भासतोय औषधांचा तुटवडा

  खरेदी प्रक्रिया ठप्प असल्याचा परिणाम

  प्रशासनाचा मदतीसाठी सेंटर सुरु केलेल्या संस्था,आस्थापना औषध मिळत नसल्याने हवलादिल

  औषध पुरवठा सुरळीत करण्याची होतेय मागणी

 • 11 May 2021 08:09 AM (IST)

  लॉकडाऊनच्या भीतीने नाशिककरांची बाजारात तुफान गर्दी

  नाशिक –

  लॉकडाऊनच्या भीतीने नाशिककरांची बाजारात तुफान गर्दी

  भाजी, किराणा घेण्यासाठी शहरात उडाली झुंबड

  सराफ बाजार, मेन रोड परिसरात सकाळीच ट्रॅफिक
  जाम

  लॉक दाऊनच्या आधीच कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती

 • 11 May 2021 08:08 AM (IST)

  कोल्हापूरमधील शासकीय वैद्यकीयच्या सूक्ष्मजीवशास्त्र भागातील दोन स्वॅब तपासणी मशीन बंद

  कोल्हापूर

  शासकीय वैद्यकीयच्या सूक्ष्मजीवशास्त्र भागातील दोन स्वॅब तपासणी मशीन बंद

  तांत्रिक कारणामुळे गेल्या दोन दिवसांपासून मशीन आहेत बंद

  संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात 107 केंद्रावर रोज घेतले जातात जवळपास 3 हजार स्वब नमुने

  मात्र चार पैकी दोन Swab मशिन बंद असल्याने एक ते दीड हजार स्वब ची पुणे आणि रत्नागिरी मधून करावी लागतेय तपासणी

  पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात ही स्वब तपासणी ची संख्या अधिक

  परिणामी कोल्हापूर मधील स्वब अहवाल मिळालायला लागतोय होतोय उशीर

  प्रशासनाकडून बंद पडलेल्या मशीनची पाहणी

  लवकरच मशीन दुरुस्त केले जाणार

 • 11 May 2021 08:08 AM (IST)

  औरंगाबादेत ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ, 140 रुपये किंमतीचा ऑक्सिजन सिलेंडर आता थेट 425 रुपयांना

  औरंगाबाद –

  औरंगाबादेत ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ

  140 रुपये किंमतीचा ऑक्सिजन सिलेंडर आता थेट 425 रुपयांना

  खाजगी रूग्णालयांसाठी ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ

  ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा एजन्सीकडून सिलेंडरच्या किंमतीत वाढ

  ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणे कठीण

  खाजगी रुग्णालयात कोरोना उपचार महागण्याची शक्यता

 • 11 May 2021 07:36 AM (IST)

  ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून मोफत लसीकरण’, नागपूर विभागीय आयुक्त डॅा. संजीव कुमार यांचं आवाहन

  – ‘कोरोना लसीकरणासाठी वर्गणी गोळा करु नका’

  – ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून मोफत लसीकरण’

  – नागपूर विभागीय आयुक्त डॅा. संजीव कुमार यांचं आवाहन

  – स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थांनी वर्गणी गोळा न करण्याचं आवाहन

  – १८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील वयोगटासाठी केंद्रांवर निःशुल्क लसीकरण

 • 11 May 2021 07:35 AM (IST)

  पुण्यात महानगरपालिकेमार्फत शहरातील ‘बालरोग तज्ज्ञां’चा टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार

  पुणे :

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे

  महानगरपालिकेमार्फत शहरातील ‘बालरोग तज्ज्ञां’चा टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार

  महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

  पालिकेकडून कोरोनाबाधित लहान मुलांसाठी येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात ५० बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्याचे काम सुरु

  आमदार सुनिल टिंगरे यांनी त्याकरिता दिला निधी

  पालिकेने बालरोग तज्ज्ञ व सहाय्यक भरतीसाठी दिली जाहिरात

 • 11 May 2021 07:34 AM (IST)

  कोरोना रुग्णाला गरज असेल तरच रेमडेसिव्हीर देण्याचे पुणे जिल्हा प्रशासनाचे आदेश

  पुणे :

  कोरोना रुग्णाला गरज असेल तरच रेमडेसिव्हीर देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

  कोरोनाबाधित असूनही कोणतीही लक्षणे नाहीत किंवा दहापेक्षा जास्त दिवसांपासून कोरोनाची लक्षणे आहेत.

  तसेच, सौम्य आजार आहे अवयव निकामी झालेले असतील किंवा रेमडेसिव्हिरची एलर्जी आहे, अशा रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर न करण्याचा सूचना

  गरज असलेल्या रुग्णांनाच रेम्डीसिव्हर उपलब्ध व्हावे, यासाठी घेण्यात आला हा निर्णय

  कोणत्याही रुग्णालयांनी रेमडेसिव्हिरसाठी नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन दिल्यास त्यांचा पुरवठा बंद करण्याचा

  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा इशारा

 • 11 May 2021 07:32 AM (IST)

  पुणे शहरात आज दुपारी बारा वाजल्यापासून कडक नाकाबंदी

  पुणे

  शहरात आज दुपारी बारा वाजल्यापासून कडक नाकाबंदी

  सकाळी 11 नंतरही लोक घराबाहेर पडत असल्याने पोलिसांनी घेतला नाकाबंदीचा निर्णय

  बारा वाजल्यानंतर केली जाणार प्रत्येक वाहनाची तपासणी

  अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडल्यास केली जाणार दंडात्मक कारवाई

 • 11 May 2021 07:32 AM (IST)

  रुग्णालयांनी बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा निर्माण कराव्यात, विभागीय आयुक्तांच्या सूचना

  पुणे

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन रुग्णालयांनी बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा निर्माण कराव्यात

  विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या स्थानिक प्रशासनाला सूचना

  लहान मुले कोरोनाने बाधित झाल्यास त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र केंद्र तयार करण्याबाबत विचार करावा

  कोविड नंतर उद्भवणाऱ्या आजाराबाबतही तयारी आवश्यक

  कोविड लसीकरणावर अधिकाधिक भर देण्याच्या सूचना

  सर्व प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरांनी कोरोना काळात सेवा देण्याचे आवाहन

  सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरच्या वापराबाबत पालकांनी बालकांमध्ये जागृती करावी

  कोरोनामुळे निर्माण झालेला ताण तणाव व भीती दूर करण्यासाठी मनसोपचार तज्ञ, स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे

 • 11 May 2021 07:21 AM (IST)

  नागपुरात 45 वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण आज पुन्हा बंद

  – नागपुरात 45 वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण आज पुन्हा बंद

  – लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय

  – लसीकरण वारंवार बंद होत असल्याने ४५ वर्षांवरील नागरीक संतप्त

  – नागपूरातील सहा केंद्रांवर आज १८ ते ४४ वर्षावरील वयोगटाचं लसीकरण सुरु

 • 11 May 2021 07:19 AM (IST)

  मार्चनंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

  – मार्चनंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

  – जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २५३० नवे रुग्ण, ६०६८ रुग्णांची कोरोनावर मात

  – रुग्णसंख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा

  – नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने १५३८ ॲाक्सीजन बेड रिकामे

  – दोन महिन्यात पहिल्यांदाच १९८ ICU बेड रिकामे

  – जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र

 • 11 May 2021 06:57 AM (IST)

  अंगुल येथून ऑक्सिजन घेऊन निघालेली खास ऑक्सिजन एक्स्प्रेस आज रात्री पुण्यात पोहोचणार

  पुणे –

  अंगुल (ओदिशा) येथून पुण्यासाठी ऑक्सिजन घेऊन निघालेली खास ऑक्सिजन एक्स्प्रेस आज रात्री पुण्यात पोहोचणार

  सकाळी काही टँकर नागपूर स्थानकावर उतरविण्यात येणार

  उर्वरित चार टँकर रात्री आठ ते नऊच्या लोणी रेल्वे स्थानकावर पोहोचणार

  पुणे विभागात दाखल होणारी ही पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस

  पुणे रेल्वे विभागाने तीन ठिकाणी रॅम्पची सोय करून टँकर उतरविण्याची व्यवस्था

  यात खडकी, लोणी व कोल्हापूर येथील गूळ मार्केटचा समावेश

  जर लोणी स्थानकावर ऑक्सिजन टँकर उतरवण्यास अडचण आली तर खडकी स्थानकावर टँकर उतरविले जाणार

 • 11 May 2021 06:56 AM (IST)

  लॉकडाऊनमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी गेल्या 17 दिवसांमध्ये 1 लाख 5 हजार 744 पुणेकरांनी ई-पास मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज

  पुणे :

  लॉकडाऊनमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी गेल्या 17 दिवसांमध्ये 1 लाख 5 हजार 744 पुणेकरांनी ई-पास मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज

  त्यापैकी 27 हजार 592 जणांचे ई-पास मंजूर

  तर तब्बल 57 हजार 99 जणांचे अर्ज फेटाळले

 • 11 May 2021 06:55 AM (IST)

  कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अडते आणि डमी अडत्यांवर बाजार समितीने केली कारवाई

  पुणे :

  कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अडते आणि डमी अडत्यांवर बाजार समितीने केली कारवाई

  या कारवाईदरम्यान ५५ जणांकडून जीएसटीसह ५२,१५३ रुपयांचा दंड केला वसूल

  तर फळ विभागात कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करून पाच हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल

  कृषी उत्पन्न बाजार समितीचे तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, फळ विभागाचे गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी केली ही कारवाई

 • 11 May 2021 06:51 AM (IST)

  पुण्यात नव्याने लस पुरवठा झाला नसल्याने आज फक्त 50 केंद्रांवर लसीकरण केले जाणार

  पुणे :

  नव्याने लस पुरवठा झाला नसल्याने आज फक्त 50 केंद्रांवर लसीकरण केले जाणार

  यातील 40 केंद्रांवर कोव्हीशील्ड तर 10 केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस मिळणार

  या ठिकाणी दुसऱ्या डोससाठीच्या नागरिकांना लस दिली जाणार

  27 मार्च पूर्वी पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना कोविशिल्डचा दुसरा डोस व पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्यांसाठी 20 टक्के लस उपलब्ध

  तर ज्यांनी 13 एप्रिलपूर्वी कोव्हॅक्सीन पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार

  18 ते 44 वयोगटासाठीच्या केंद्रांची संख्या 6 वरुन कमी करुन 2 करण्यात आली

  यामध्ये कमला नेहरू रुग्णालयात 500 डोस आणि राजीव गांधी रुग्णालयासाठी 500 डोस उपलब्ध

  ऑनलाइन बुकिंग केलेल्यांनाच मिळणार लसीचा पहिला डोस

 • 11 May 2021 06:48 AM (IST)

  लॉकडाऊनच्या कालावधीत होणारे बालविवाह रोखण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना

  पुणे –

  लॉकडाऊनच्या कालावधीत होणारे बालविवाह रोखण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना

  जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना

  एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यातील वेगवेगळया भागात एकूण ५६० बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश

  पुणे जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश

 • 11 May 2021 06:46 AM (IST)

  पुण्यात गेल्या 24 तासांत 1165 नवे रुग्ण, 74 जणांचा मृत्यू

  पुणे :

  – गेल्या 24 तासांत 1165 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – गेल्या 24 तासांत 4010 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधीत 74 रुग्णांचा मृत्यू, 23 रूग्ण पुण्याबाहेरील

  – 1402 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 447729

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 308306

  – एकूण मृत्यू – 7409

  – आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 409484

  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11499

 • 11 May 2021 06:41 AM (IST)

  पुण्यात आजपासून लॉकडाऊन होणार आणखी कडक

  पुणे –

  – पुण्यात आजपासून लॉकडाऊन होणार आणखी कडक

  – नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन,

  – आजपासून दुपारी १२ नंतर रस्त्यावर येणार्‍या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करण्यात येणार,

  – हाय कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांचे कडक कारवाईचे संकेत,

  – पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती

 • 11 May 2021 06:40 AM (IST)

  राज्याला दिलासा, नवी रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली, दिवसभरात 37,326 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  राज्याला दिलासा

  गेल्या 24 तासांत 37,326 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  तर 61.607 रुग्णांना डिस्चार्ज

  तर गेल्या 24 तासांत 549 रुग्णांचा मृत्यू

 • 11 May 2021 06:39 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासांत 1134 नवे रुग्ण, 64 जणांचा मृत्यू

  पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट

  कोरोना रुग्ण -1134
  कोरोनामुक्त -1965
  मृत्यू -64

  आत्तापर्यंत
  कोरोना रुग्ण -231357
  कोरोनामुक्त -206988
  मृत्यू -3378

 • 11 May 2021 06:38 AM (IST)

  राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

  लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढण्याचे संकेत

  कॅबिनेट बैठकीमध्ये अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

  अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती कायम

  लॉकडाऊन वाढवण्याची मागणी

  याआधी लॉकडाऊनबाबत घेतलेल्या निर्णयात कुठलीही सूट न मिळण्याची शक्यता

  आता 15 मेपर्यंत आहे लॉकडाऊन

  तो पुढे वाढवण्याचे संकेत