शिक्षकांनो टी शर्ट, जीन्स विसरा, सरकारने लागू केला शाळांमध्ये ड्रेसकोड

Maharashtra Dress Code: सरकारच्या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. काय वापरावे आणि काय वापरु नये, हा प्रत्येकाचा वैयक्तीक अधिकार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष शिवनाथ दराडे यांनी म्हटले आहे.

शिक्षकांनो टी शर्ट, जीन्स विसरा, सरकारने लागू केला शाळांमध्ये ड्रेसकोड
Maharashtra Dress Code
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 9:11 AM

मुंबई | 19 मार्च 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील खासगी आणि सरकारी शाळांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. यामुळे आता सर्व शिक्षकांना शाळांमध्ये टी शर्ट, जीन्स परिधान करता येणार नाही. तसेच प्रिन्ट आणि डिझाइन असलेले कपडे वापरता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. हा आदेश फक्त सरकारी नाही तर खासगी शाळांमध्ये लागू असणार आहे. यामुळे सर्वच शिक्षकांना शाळांमध्ये सोबर कपडे परिधान करावे लागणार आहेत.

काय वापरता येईल अन् काय नाही

शिक्षकांना शाळांमध्ये टी शर्ट, जीन्स वापरता येणार नाही. शिक्षकांना प्रिंट असणारे शर्ट वापरता येणार नाही. महिला आणि पुरुष शिक्षकांना ड्रेस बरोबर फुटवेअर घालण्याचे म्हटले आहे. पुरुषांनी बूट वापरावे, असे आदेशात म्हटले आहे. शिक्षकांनी घातलेला ड्रेस स्वच्छ असायला हवा. इन केली गेली पाहिजे. महिला शिक्षकांना साडी किंवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा वापरता येणार आहे. पुरुष शिक्षक शर्ट आणि पॅन्ट परिधान करु शकतात. सरकारने शाळांना ड्रेस कोड निवडण्याचा सल्ला दिला आहे. पुरुष शिक्षकांचा ड्रेस कोड हलक्या रंगाचा असला पाहिजे. स्काउट गाइड शिकवणाऱ्या शिक्षकांनी स्काउट गाइडचा ड्रेस घातला पाहिजे. एखाद्या शिक्षकास वैद्यकीय कारणामुळे बूट वापरणे शक्य नसेल तर त्यांना सुट दिली गेली पाहिजे.

खासगी शाळांमध्ये आदेश लागू

सरकारचा आदेश फक्त सरकारी नाही तर खासगी शाळांमध्ये लागू करण्यात आहे. तसेच शिक्षकांना आपल्या नावापुढे ‘Tr’ किंवा मराठीत ‘टी’ लावता येईल. हे चिन्ह शिक्षक आपल्या वाहनांवर लावू शकतात.

हे सुद्धा वाचा

शिक्षक संघटनांचा विरोध

शिक्षकांच्या ड्रेस कोडला शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष शिवनाथ दराडे यांनी म्हटले आहे की, काय वापरावे, काय वापरु नये, हा शिक्षकांचा वैयक्तीक प्रश्न आहे. सरकारने शिक्षकांचा ड्रेसकोडबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिक्षकांच्या ड्रेसचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये, त्यामुळे हा ड्रेस कोड करण्यात आला आहे.

हे ही वाचा

शाळांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थनेसोबत म्हटले जाणार नवीन गीत, राज्य सरकारने काढले आदेश

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...