AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Drought: राज्यात दुष्काळी परिस्थिती, सरकार Action मोडवर, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आज कुठे-कुठे जाणार?

Maharashtra Drought Devendra Fadnavis-Eknath Shinde: मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर पावसाने डोळे वटारले. शेतातील उभं पिक वाळून गेले. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. सरकारने ताताडीने दुष्काळ जाहीर करून मदत करण्याची आग्रही मागणी होत आहे.

Maharashtra Drought: राज्यात दुष्काळी परिस्थिती, सरकार Action मोडवर, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आज कुठे-कुठे जाणार?
महाराष्ट्र दुष्काळ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 23, 2026 | 7:42 AM
Share

राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा हाततोंडाचा घास निसर्गाने हिसकावला. गुराढोरांच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट घोंगावत आहे. अल निनोचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान राज्य सरकार दुष्काळी परिस्थितीत अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक पाहणी करतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि महसूली विभागीय जिल्हा अमरावतीचा दौरा करतील .उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर

दुष्काळी परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा करतील. लातूर जिल्हा दौऱ्यावर, औसा आणि निलंगा तालुक्यातल्या जाऊ, खरोसा, लामजना गावच्या शिवारात पावसा अभावी नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करणार. खरोसा इथ मुख्यमंत्री शेतकर्‍यांशी संवाद साधतील अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री धाराशिवच्या कळंबमधील यरमाळा आणि तुळजापूर इथं पाहणी करतील.

आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थितीच्या पाहणीला सुरुवात करतील धाराशिव तालुक्यातील करजखेडा तर कळंब तालुक्यातील मलकापूर येथे मुख्यमंत्री पावसा अभावी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांबरोबर संवाद साधतील. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना मदतीबाबत काय घोषणा होणार? दुष्काळाबाबत काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तीन ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा असेल.

एकनाथ शिंदे पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात शिंदे हे पीक पाहणी करतील. शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना बांधावर जाऊन पंचनामे आणि पीक पाहणी करण्याचे तसेच गावा गावात जाऊन जनता दरबार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवसेनेचा प्रत्येक मंत्री ग्राऊंड झिरोवर उतरला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असून मदत करण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

सुनेत्रा पवारांनी घेतला आढावा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मोर्शी विधानसभेचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली. यावेळी वरूड-मोर्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या, पाणी टंचाईबाबतची माहिती भुयार यांनी दिली. सुनेत्रा पवार यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला.

जालन्यात दुष्काळ निवारणासाठी वॉर रूम स्थापन

जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्यानं दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता दुष्काळ निवारण कक्ष अर्थात वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यांमध्ये पावसाचा मोठा खंड असल्याचं प्रशासनाच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.विशेष म्हणजे,जिल्ह्यातील 52 महसूल मंडळांमध्ये विविध कालावधीत सलग पावसाचा खंड झाला आहे.एकूणच लहरीपणामुळे खरीप पिकांवर मोठ संकट निर्माण झालंय त्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हे आदेश काढून दुष्काळ निवारण कक्ष अर्थात वॉर रूम स्थापन केली आहे.दरम्यान या स्थापन केलेल्या वॉर रूमच्या माध्यमातून पिकांची सद्यस्थिती,चाऱ्याची उपलब्धता,पाणी साठा आणि पाणीपुरवठा,संभाव्य स्थलांतर,ई-पिक पाहणी,मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग,पाणी स्रोत आणि टँकर फिलिंग पॉइंट्स यांचा दररोज आढावा घेतला जाणार आहे.

धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव जिल्हा दौरा

धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रताप सरनाईक ही दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. धाराशिव तालुक्यातील करजखेडा आणि कळंब तालुक्यातील मलकापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रताप सरनाईक पाहणी दौरा करणार आहेत

कृषिमंत्र्यांकडून दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा

कोकण विभागीय बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आढावा बैठक नवी मुंबईतील सिडको भवन येथे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच संबंधित जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाई, शेती व पिकांवरील परिणाम तसेच शेतकऱ्यांसमोरील विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?