AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत वाढ? वगळलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांनाही मदतीचा हात, मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

Cabinet sub committee meeting today: आज मुंबईत दुष्काळ निवारण मंत्री मंडळ उपसमितीची बैठक होत आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे. तर ट्रिगर 2 मध्ये 43 तालुके आहेत. अजून काही तालुक्यांची त्यात भर पडण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी, दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत वाढ? वगळलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांनाही मदतीचा हात, मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक
दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत वाढ? वगळलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांनाही मदतीचा हात
| Updated on: Oct 14, 2026 | 9:54 AM
Share

Maharashtra Dry Drought: राज्यात दुष्काळाने तांडव घातले आहे. ऐन हिवाळ्यातच महिलांच्या डोई हंडे आले आहेत. तर अनेक गावं ओस पडायला सुरुवात झाली आहे. रोजगार आणि पोटापाण्यासाठी शहराकडे अनेकांनी धाव घ्यायला सुरुवात केली आहे. सरकारने 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे. तर ट्रिगर 2 मध्ये 43 तालुके आहेत. अजून काही तालुक्यांची त्यात भर पडण्याची शक्यता आहे. आज याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची आणि कडब्याची सोय करून देणे ही सरकार पुढील सर्वात मोठे आवाहन आहे. तातडीने उपाय योजना सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

दुष्काळ निवारण मंत्री मंडळ उपसमितीची आज बैठक होत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. परीक्षा शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँक व पतपेढींना धारेवर धरण्याची शक्यता आहे. पिण्याचे पाणी, चार्‍याचे नियोजन यांचा आढावा घेतला जाणार आहे. मोफत अन्नधान्य पुरवठ्याचेही नियोजन केले जाणार आहे.

सांगोल्यात दुष्काळाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

सांगोला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चिंचोली आणि घेरडी गावांत पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू असून, शाळेतून घरी आल्यानंतर मुलांनाही अभ्यास सोडून पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. शेती, जनावरांचे पाणी आणि घरगुती गरजांसाठी ग्रामस्थांची मोठी परवड होत आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढवून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 12 वाजता पैठण गेट येथून या मोर्चाला सुरुवात होईल. तो विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, खासदार कल्याण काळे, खासदार रवींद्र चव्हाण आणि शिवाजीराव काळगे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील 1448 गावातील पंचनामे पूर्ण अहवाल

बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानाचे सर्व 1448 गावातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील सात लाख 18 हजार 2258 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनामातून समोर आले आहे. जिल्ह्यातील सर्व तेरा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ट्रिगर 1 लागू करण्यात आला आहे. या नुकसानाचा एकत्रित अहवाल पुढील दोन दिवसात राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांचे लक्ष नुकसान भरपाई आणि शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.

परीक्षा शुल्क माफीसाठी अमरावती विद्यापीठाचे मोठे पाऊल

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अमरावती विद्यापीठाकडून कृती समिती स्थापन महाविद्यालयांकडून शुल्क माफीचे अर्ज मागविणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावर्ती विद्यापीठाने यासाठी एका विशेष कृती समितीची स्थापना केली आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महाविद्यालयांमार्फत अर्ज मागविले जाणार आहेत. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी विद्यापीठाने विविध महाविद्यालयांवर सोपविली आहे.

मराठवाड्यात 2022 ते 2026 पाच वर्षांच्या पावसाच्या तुलनेत यंदा मोठी तूट

2025 मध्ये 951.6 मिमी पाऊस, यंदा केवळ 445 मिमीची नोंद

पाच वर्षांत यंदाचा पाऊस सर्वात कमी, सरासरीच्या तुलनेत 34.5% तूट

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 506.6 मिमी पाऊस कमी.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 53.2 टक्के पावसाची घट

मराठवाड्यातील पाच वर्षांतील पाऊस

2022 – 877.20 मिमी – 129.2%

2023 – 577.40 मिमी – 85.0%

2024 – 887.10 मिमी – 130.7%

2025 – 951.60 मिमी – 140.2%

2026 – 445.00 मिमी – 65.5%

सरासरी पाऊस – 678.9 मिमी

यंदाची तूट – 233.9 मिमी (34.5%)

2025 च्या तुलनेत घट – 506.6 मिमी (53.2%)

Follow Us
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे