AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदावरुन पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले….

Maharashtra Assembly Election 2024 Result : महाराष्ट्रात राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलं आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशात या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदावरुन पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले....
devendra fadnavis on cm post maharashtra election result 2024
| Updated on: Nov 23, 2024 | 3:55 PM
Share

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर सर्वांना 23 नोव्हेंबर अर्थात निकालाच्या दिवसाची प्रतिक्षा होती. मतदानानंतर अनेक एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीचं सरकार येईल, तसेच मविआ सहज 100 पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र एक्झीट पोलचे सर्व अंदाज फोल ठरले आहेत. राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलंय. तसेच भाजप हा महायुतीतला मोठा भाऊ ठरला आहे. एकट्या भाजपचे 120 पेक्षा अधिक उमेदवार जिंकून आले आहेत. या विजयानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत प्रतिक्रिया दिली.

मतदानाआधी आणि मतदानानंतर कुणाचा मुख्यमंत्री होईल? अशी चर्चा होती. मात्र आता निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार? हे अजून स्पष्ट नाही. आता देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्रि‍पदाबाबत काय म्हणाले? हे जाणून घेऊयात.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मुख्यमंत्रिपदावरुन आमच्यात कोणताही वाद नाही. महायुतीतील सीएम पदावरुन वाद होणार नाहीत. तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“मतदारांचे आभार”

देवेंद्र फडणवीस यांनी या महाविजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना मतदारांचे आभार मानले. तसेच विरोधकांवरही प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी आत्मचिंतन करावं. विरोधकांनी पराभवाची खरी कारणं शोधावीत असंही फडणवीस यांनी म्हटलं.

“महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी असल्याचं आजच्या निकालाने हे स्पष्ट झालं आहे. आमच्या एकजुटीचा हा सर्वात मोठा विजय आहे. विविध संतांचा देखील हा विजय आहे. लाडक्या बहि‍णींचे विशेष आभार मानतो. तसेच अमित शाह आणि नड्डा यांचेही विशेष आभारी आहे”, अशा शब्दात देंवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मतदारांसह, लाडक्या बहिणी आणि राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानले.

“माझा या विजयात खूप छोटा सहभाग आहे. आम्ही टीम म्हणून काम केलं. आम्ही विरोधकांचा सन्मान करु, त्यांची बाजू ऐकून घेऊ. तसेच मराठा आणि ओबीसी समाज आमच्यासोबत होता आणि आणि असणार आहे”, असंही देंवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.