अनिल देशमुख ईडीसमोर हजर का झाले? साहेबांनी सचिन वाझेला आदेश दिला नाही, इंद्रपाल सिंह नेमकं काय म्हणाले?
अनिल देशमुख यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्राचा आधार घेत आणि सचिन वाझेचा जबाब, शेल कंपन्यांचा आरोप करत अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली, असं वकील इंद्रपाल सिंह म्हणाले.

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता अनिल देशमुख यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. टीव्ही 9 मराठीनं अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांच्याशी संवाद साधला. यावेळी इंद्रपाल सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर खोट्या आरोपाखाली कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं.
परमबीर सिंगाच्या पत्रावरुन ईडीची कारवाई
अनिल देशमुख यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्राचा आधार घेत आणि सचिन वाझेचा जबाब, शेल कंपन्यांचा आरोप करत अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. जेव्हा अँटिलिया केस झाली, मनसूख हिरेन खून प्रकरण झाल्यानंतर गृहमंत्रालय आणि अनिल देशमुख यांना परमबीर सिंग यांचा त्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आल्यानं सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. परमबीर सिंग यांनी बदल्याच्या भावनेतून अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिल्याचा दावा इंद्रपाल सिंह यांनी केला.
देशमुख यांनी सचिन वाझेला फोन केला नाही
आम्ही सेक्शन 15 अंतर्गत आमचा जबाब नोंदवला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेची भेट घेतली नाही. सचिन वाझेंशी कधी फोन केलेला नाही. कुठलेही निर्देश किंवा आदेश गृहमंत्रालय किंवा अनिल देशमुख यांच्याकडून सचिन वाझेला आदेश देण्यात आला नाही. सचिन वाझे करत असलेला आरोप खोटा आहे, असा दावा इंद्रपाल सिंह यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांच्याकडे पुरावे नाहीत
परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगात त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. ती केस बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे आरोप तथ्यहीन असल्याचं इंद्रपाल सिंह म्हणाले.
अनिल देशमुख गायब का?
आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तिथं आम्हाला आरोपी नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले. अनिल देशमुख यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आलेलं नव्हतं. अनिल देशमुख त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करत होते. अनिल देशमुख यांच्या साई शिक्षणसंस्थेबद्दल इंद्रपाल सिंह म्हणाले की अनिल देशमुख कोणत्याही शिक्षण संस्थेत, कंपनीत संचालक मंडळावर नाहीत. अनिल देशमुख यांची जॉईंट फॅमिली नाही त्यामुळे मुलांच्या कंपन्यांचा संबंध जोडता येणार नाही, असं इंद्रपाल सिंह म्हणाले.
इतर बातम्या:
ठाकरे सरकारच्या मदतीनं परमबीर सिंग गायब, आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप
Anil Deshmukh lawyer Indrapal Singh said ED taken action on baseless grounds of Parambir Singh
