वेळ आली तर तुमची काळी संपत्ती आज ना उद्या काढणार, नवाब मलिक यांचा अमृता फडणवीसांना इशारा

वेळ आली तर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार, असा उघड इशाराच मंत्री नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे. नवाब मलिक त्यांच्या जावयाला वाचविण्यासाठी आणि काळ्या संपत्तीला वाचविण्यासाठी दररोज पत्रकार परिषदा घेत आहेत, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली होती.

वेळ आली तर तुमची काळी संपत्ती आज ना उद्या काढणार, नवाब मलिक यांचा अमृता फडणवीसांना इशारा
अमृता फडणवीस आणि नवाब मलिक

मुंबई : वेळ आली तर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार, असा उघड इशाराच मंत्री नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे. नवाब मलिक त्यांच्या जावयाला वाचविण्यासाठी आणि काळ्या संपत्तीला वाचविण्यासाठी दररोज पत्रकार परिषदा घेत आहेत, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांवर गंभीर केले. अगदी मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी अ्सल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद संपते ना संपते तोच दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी फडणवीसांचे सगळे आरोप फेटाळले. कालचा दिवसभर या दोन नेत्यांच्या पत्रकार परिषदेने गाजला. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन मलिकांवर हल्लाबोल केला. त्यांच्या आरोपांना मलिकांनी प्रत्युत्तर दिलं.

नवाब मलिक यांचं अमृता फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर

वरळीत दोनदोनशे कोटी रुपयांचे फ्लॅट कुणाच्या नावावर आहेत?, असा सवाल करत यांची काळी संपत्ती काढायची वेळ आली तर ते पण आज ना उद्या काढूच, असा उघड इशाराच त्यांनी अमृता फडणवीस यांनी दिला. चोर मचाये शोर, असंच म्हणावं लागेल. शेवटी मी महिलांच्या टीकेला उत्तर देऊ इच्छित नाही. माझी इच्छाही नाही, असंही मलिक म्हणाले.

अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या होत्या?

बिगडे नवाबने प्रेस कॉन्फरन्स पर प्रेस कॉन्फरन्स बुलाई लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई, लक्ष्य इनका एक ही है,मेरे भई- बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई!, अशा शब्दात त्यांनी नवाब मलिक यांना लक्ष्य केलं.

(Maharashtra minister Nawab Malik reply Amruta fadanvis)

हे ही वाचा :

उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, नवाब मलिकांनी फडणवीसांना डिवचलं, कोणता बॉम्ब फोडणार?

Nawab Malik PC Live : बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Published On - 11:40 am, Wed, 10 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI