मोठी बातमी ! अजितदादा गटातही स्वबळाचे वारे…?, बड्या नेत्याचं विधान काय? महायुतीला धक्का बसणार?

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली आहे. नवाब मलिक यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीने स्वबळावर लढल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीला मोठा धक्का बसेल, अशी चर्चा आहे.

मोठी बातमी ! अजितदादा गटातही स्वबळाचे वारे...?, बड्या नेत्याचं विधान काय? महायुतीला धक्का बसणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 9:11 PM

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने राज्यातील सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उभी फूट पडली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत या घटना घडत असतानाच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीतही स्वबळावर निवडणुका लढण्याचं घटत आहे. आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला. महापालिका स्वबळावर लढली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का? महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीलाही धक्का बसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीची माटुंग्यात आज बैठक होती. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीचां आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला नवाब मलिक, आमदार सना मलिक आणि सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. या शिवाय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवाब मलिक यांनी स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी धरली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या मुंबईत आपण कधीच 14 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू शकलो नाही. एकसंघ असतानाही आपण कधीच जास्त नगरसेवक निवडून आणले नाहीत. आता पक्षाचे दोन भाग झाल्यावर कार्यकर्त्यांच्या मनात चिंता आहे. कार्यकर्ते संभ्रमित आहेत. महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचं की महायुतीत लढायचं हा संभ्रम आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

मित्र पक्ष सोबत घेईल हे विसरा

जोपर्यंत एखाद्या पक्षाची ताकद नसते तोपर्यंत त्या पक्षाला कोणीही विचारत नाही. आज मित्र पक्ष तुम्हाला सोबत घेईल हे विसरून जा. तुमची ताकद असेल तरच मित्र पक्षही तुम्हाला विचारेल. त्यामुळे तुम्हाला मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावीच लागेल. तुम्हाला तुमची ताकद निर्माण करावीच लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.

तर वेगळा ठसा निर्माण करू शकतो

नवीन लोकं जोडल्याशिवाय पक्ष वाढत नाही. तुम्हाला वाटत असेल भाजपसोबत जायचं आहे, भाजपसोबत जायचं आहे. पण भाजप परमनंट आपल्यासोबत राहील असं वाटत असेल तर हा विचार सोडून द्या. राजकारणात कोणीही कुणासोबत परमनंट राहत नाही. जो ताकदवान असतो त्याला लोकं विचारतात. ताकद नसेल तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. उद्या चालते व्हा म्हणून सांगू शकतील, पण आपली ताकद असेल तर आपण स्वबळावर या मुंबईत वेगळा ठसा निर्माण करू शकतो. 14 पेक्षा जास्त नगरसेवक आले नाही, हा आपल्यावरचा ठपका आहे. आपण व्यवस्थित लढलो आणि बुथवर 100 मतांची ताकद निर्माण केली तर आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू शकतो. आपल्यावरचा ठपका आपण पुसून टाकू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्
अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्.
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट.
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा.
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल.
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"