राज्याच्या बांधकाम विभागाची दमदार कामगिरी, 24 तासांत 40 किमी रस्त्याचं काम पूर्ण! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम केलाय.

राज्याच्या बांधकाम विभागाची दमदार कामगिरी, 24 तासांत 40 किमी रस्त्याचं काम पूर्ण! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांचा रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभाग आपल्या दमदार कामगिरीमुळे ओळखला जातो. गडकरींच्या विभागाप्रमाणे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागानंही असंच एक काम करुन दाखवलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचं काम केलं आहे. सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलाय. (Public Works Department constructed 40 km roads in 24 hours in Satara)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये राज्य मार्ग क्र. 147 फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. काल रविवारी, दि. ३० मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.

अशोक चव्हाणांकडून कौतुक

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगिरीचं कौतुक खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनीही केलंय. हे काम करुन प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केलंय. कोरोनाच्या या काळामध्ये अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढवला आहे, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी विभागाच्या कामगिरीचं कौतुक केलंय.

‘आपलाच विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित करणार’

आज एक नवीन विक्रम झाला म्हणून आम्ही इथेच थांबणार नाही. विक्रम रचणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणे, ही अधिक अभिमानास्पद बाब असते. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे वापरून आणखी नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे. त्या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश मी विभागाला दिले आहेत, अशी माहितीही चव्हाण यांनी दिलीय.

इतर बातम्या :

रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून गाफील राहू नका; राजेश टोपेंचे प्रशासनाला निर्देश

Pune Lockdown Update : पुण्यातील लॉकडाऊन शिथिल, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु

Public Works Department constructed 40 km roads in 24 hours in Satara

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI