महाराष्ट्रात पुनश्च: कडकडीत लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच घोषणा करणार?

हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Strict Lockdown)

महाराष्ट्रात पुनश्च: कडकडीत लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच घोषणा करणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 9:13 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात असल्याचे बोललं जात आहे. (Maharashtra Strict Lockdown CM Uddhav Thackeray Will Announce Today)

राज्यात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

राज्यातील वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर काल (20 एप्रिल) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

”राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहे. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील”, असे एकनाथ शिंदे काल म्हणाले.

राज्यामध्ये कोविडचे आकडे वाढतायत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारे आकडे खाली आणायचे असल्यास कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही माणसं फिरतायत, वाहनं फिरतायत, नंबर खाली येत नाहीयेत. त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

?काय सुरु राहणार??

?सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे आणि कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तिक आणि संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील. ? वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते. ?स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना आणि सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते. ?या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.

?काय बंद राहणार??

?शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास

?आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक

?मेट्रो रेल्वेवर निर्बंधाची चिन्हं

?मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंदीची शक्यता

?सिनेमाघरं, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणं.

?कोणत्याही स्वरुपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम

?विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळं

?शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र

?सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.

लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय : पंतप्रधान मोदी

कोरोनाची दुसरी लाट, वाढते रुग्ण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील जनतेशी संवाद साधला. यावेली त्यांनी लॉकाडऊन हा अगदी शेवटचा पर्याय म्हणून वापरावा, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले. (Maharashtra Strict Lockdown CM Uddhav Thackeray Will Announce Today)

संबंधित बातम्या : 

PM Narendra Modi Live | लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावा- मोदी

Maharashtra vaccination plan : महाराष्ट्राचा अॅक्शन प्लॅन ठरला, परदेशातून लसी मागवणार, 10 कोटींचं टार्गेट

Maharashtra Corona Update : चिंता कायम; राज्यात दिवसभरात 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 62 हजार 97 नवे रुग्ण

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.