… तर 50 टक्क्यांमध्ये समावून घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मराठा आरक्षणावरून अजित पवार यांचं रक्त सळसळत नाही का? असा सवाल करतानाच अशोक चव्हाण हे मराठाच नाहीत, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली आहे. (maratha kranti morcha reaction on maratha reservation)

... तर 50 टक्क्यांमध्ये समावून घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 7:08 PM

मुंबई: येत्या 25 जानेवारी रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. आमची फसगत झाली तर 50 टक्के आरक्षणात मराठा समाजाला सामावून घ्यावं, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. (maratha kranti morcha reaction on maratha reservation)

मुंबईच्या आझाद मैदानात आज मराठा क्रांती मोर्चाची सभा पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदही झाली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी ही मागणी केली. 25 जानेवारी रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे. यावेळी जर आमची फसगत झाली तर सध्या अस्तित्वात असलेल्या 50 टक्के आरक्षणात आम्हाला सामावून घेण्याची तयारी सरकारने करावी, असा इशारा पवार यांनी दिला. अनेक तरुणांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या नियुक्त्या करण्यात याव्यात, अन्यथा पुढे आमची आंदोलने उग्र झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असंही ते म्हणाले.

सरकारी नोकरीमध्ये अनेक न्यायालयीन निर्णय आणि नियमावली, विविध शासन निर्णय याचे चुकीचे अर्थ लावण्यात आलेत. त्यामुळे राज्यातून बेरोजगार युवकांनी केलेल्या भरती पूर्व आरक्षण आणि अनुशेष संदर्भात आढावा घेण्याच्या मागणीवर शासनाने विचार करावा, EWS आरक्षणाच्या माध्यमातून चाललेली दिशाभूल थांबवावी, औरंगाबादचे नामांतर करून तत्काळ “छत्रपती संभाजीनगर” असं करावं, समांतर आरक्षणाच्या प्रशासकीय चुकीने अन्याय झालेल्या मराठा समाजातील महिला उमेदवारांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

अख्खं गाव उपोषण करणार

25 जानेवारी रोजी सरकारने कोणतीही सबब सांगू नये. आमचा अपमान होणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, असं सांगतानाच येत्या 20 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील पिंपळगाव येथे संपूर्ण गाव उपोषण करणार असून धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

उदयनराजेंची गैरहजेरी

या सभेला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले येणार होते. त्यांनी सभेला येण्याचं कबूलही केलं होतं. मात्र, ते आज न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रसंगी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटीलही उपस्थित होते. (maratha kranti morcha reaction on maratha reservation)

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईक यांची 100 कोटी किमतीची 78 एकर जमीन ईडीकडून जप्त; सोमय्यांचा दावा

खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता टोपी निघू देणार नाही : रावसाहेब दानवे

शरद पवार माजी केंद्रीय मंत्री होते, पण भाजपने त्यांना साधा पायलटही दिला नाही; अनिल देशमुखांचा पलटवार

(maratha kranti morcha reaction on maratha reservation)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.