‘आरक्षणासाठी 40 जणांचं बलिदान, आम्ही फेटे बांधणार नाही’

पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्यभरात जल्लोष सुरु आहे. भाजपच्या नेत्यांनी ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष केला. मंत्रालयात तर भाजपचे आमदार भगवे फेटे बांधून आले होते. मात्र जल्लोशा करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकप्रकारे चपराक लगावण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतरच्या जल्लोषात शिवसेनेच्या 2 मंत्र्यांनी […]

'आरक्षणासाठी 40 जणांचं बलिदान, आम्ही फेटे बांधणार नाही'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्यभरात जल्लोष सुरु आहे. भाजपच्या नेत्यांनी ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष केला. मंत्रालयात तर भाजपचे आमदार भगवे फेटे बांधून आले होते. मात्र जल्लोशा करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकप्रकारे चपराक लगावण्याचा प्रयत्न केला.

मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतरच्या जल्लोषात शिवसेनेच्या 2 मंत्र्यांनी फेटे बांधणे नाकारलं. पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी फेटा बांधायला नकार दिला. मराठा आरक्षणासाठी आंदोलनात 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असताना, आम्ही फेटा बांधून जल्लोष करु शकत नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या या दोन बड्या मंत्र्यांनी घेतली. पूर्ण जल्लोषात या नेत्यांनी फेटे बांधलेच नाहीत.

शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांच्या या पवित्र्यामुळे वातावरण काहीसं तणावपूर्ण बनलं.

मराठा आरक्षण

मराठ्यांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. मराठ्यांना 16 टक्के आरक्षण जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील भाजप-शिवसेना सरकार मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार आहे. तशी तरतूद मागासवर्ग आयोग अहवालाच्या कृती अहवालात आहे. हा अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे. मराठा समाजाला एसईबीसी अर्थात सामाजिक आणि शैक्षणिक मागास या प्रवर्गातून आरक्षण जाहीर झालं आहे. 1 डिसेंबरला थेट जल्लोष करा, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिला होता. तो शब्द पाळत मुख्यमंत्र्यांनी पाळलं असं म्हणावं लागेल.

राज्य सरकार विधेयक मांडल्यानंतर त्याला दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली. आता विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी त्यावर राज्यपालांची सही गरजेची असेल. ती मिळाल्यानंतर मराठा आरक्षण लागू होईल. 1 डिसेंबरपूर्वीच मराठा आरक्षण लागू होईल.

संबंधित बातम्या

जल्लोष करा! मराठ्यांना 16 टक्के आरक्षण!!

मुख्यमंत्र्यांनी अहवाल मांडताच सभागृह गरजलं, छत्रपती शिवाजी महाराज की……

सदस्य नसताना पंकजा मुंडे बैठकीत घुसल्या, नाराज होऊन 15 मिनिटात बाहेर पडल्या!

मराठ्यांना 16 टक्के आरक्षण मिळाल्यास महाराष्ट्रातील परिस्थिती कशी असेल?

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.