AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवदाम्पत्याकडून कोव्हिड सेंटरला 50 बेड, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत रुग्ण सेवेसाठी मदत

वसईच्या ग्रामीण भागासाठी लवकरच 200 बेडचं कोव्हिड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. (Married Couple Donate 50 bed covid center)

नवदाम्पत्याकडून कोव्हिड सेंटरला 50 बेड, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत रुग्ण सेवेसाठी मदत
| Updated on: Jun 21, 2020 | 8:43 PM
Share

वसई : कोरोनामुळे अनेकांनी थोडक्यात लग्न उरकण्यावर भर दिला आहे. लग्न समारंभासाठी वाचणाऱ्या पैशातून अनेक लोक गोरगरिबांना मदत करत आहे. वसईत एका ख्रिस्ती दांपत्याने लग्नात वाचलेल्या पैशात चक्क कोव्हिड सेंटरला 50 बेड भेट म्हणून दिले आहेत. वसईच्या ग्रामीण भागासाठी लवकरच 200 बेडचं कोव्हिड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. (Married Couple Donate 50 bed to covid center)

वसईच्या गास गावात राहणारे एरिक लोबो (28) आणि त्याची नववधू मार्लिन तुस्कानो (27) यांचा काल शनिवारी 20 जूनला नालासोपारा पूर्व गास येथील गोन्सालो गार्सिया चर्च मध्ये विवाह पार पडला. कोरोनामुळे विवाहासाठी मर्यादा आल्यामुळे त्यांनी अगदी मोजक्या लोकांमध्ये पारंपारिक पद्धतीने विवाह केला. या विवाह सोहळ्यात आमदार क्षितिज ठाकूर, वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे, सपत्नीक उपस्थित होते.

एरीक आणि मर्लिना या दोघांचा विवाह लॉकडाऊन पूर्वीच जमलं होत. मात्र अचानक आलेल्या लॉकडाऊनमुळे विवाह करण शक्य नव्हतं. पण आपल्या विवाहाची एक अविस्मरणीय आठवण राहावी, असा दोघांचा ही मानस होता.

वसई-विरार परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णाणा बेड मिळणे कठीण झाले आहे. अशावेळी विवाहाचा आनंद साजरा करत असताना कोव्हिड रुग्णाच्या चेहऱ्यावर ही आनंद फुलवण्यासाठी त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. एरिक आणि मार्लिन नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नाचा खर्च टाळून क्वारंटाईन सेंटरला 50 बेड आणि ऑक्सिजन दिले. (Married Couple Donate 50 bed to covid center)

संबंधित बातम्या :  

ऑक्सिजनअभावी नातेवाईकाला गमावलं, मित्राकडून गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलेंडर, कारही विकली

Nashik Corona | नाशकात सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल, पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच थांबण्याचा सल्ला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.