VIDEO: भाजपला भौ- भौ करत राहू दे, ते अगदी दूध के धुलेच आहेत; महापौर किशोरी पेडणेकरांचा टोला

मालाडमध्ये इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. त्यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला असून त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे.

VIDEO: भाजपला भौ- भौ करत राहू दे, ते अगदी दूध के धुलेच आहेत; महापौर किशोरी पेडणेकरांचा टोला
mayor kishori pednekar
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 1:02 PM

मुंबई: मालाडमध्ये इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. त्यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला असून त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. भाजपला भौ भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत, अशी खोचक टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. (mayor kishori pednekar slams bjp over Malad Building Collapse incidents)

मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी भाजपकडून होत असलेल्या आरोपांबाबत महापौरांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप काय म्हणतंय ना ते भौ भौ काय करायचं ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना हे करते ते करते असं ते सांगत आहेत. हे अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम, असा चिमटा महापौरांनी काढला.

मंगळवारी निर्णय घेणार

आपल्याला या कोविड-19 मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अनधिकृत कामे झाली. त्याचे फायदे घेणाऱ्यांनी घेतले आहेत. त्याच्याबद्दल मागच्यावेळी मिटिंग झाल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांकडेही या अनधिकृत बांधकामांविषयी मिटिंग झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूखंडावर आणि बीपीटीच्या भूखंडावरही अनधिकृत बांधकाम झालं आहे. महापालिकेच्या भूखंडावरही अतिक्रमण झालं आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी आढावा घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

आमचे हात बांधले जातात

या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आमचे अधिकारी जातात. तेव्हा त्यांना कोर्टाचे आदेश दाखवले जातात. कोरोना आहे, कारवाई करू नका, असं सांगितलं जातं. त्यामुळे आमचे हात बांधले जातात. त्यामुळे यावर निश्चितच ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

विरोधकांच्या अंगात वारं भरतं

पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले होते. त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही किशोरी पेडणेकर यांनी समाचार घेतला. मुंबईत पाणी भरलं रे भरलं की विरोधकांच्या अंगात वारं भरतं, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

मालाड दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. (mayor kishori pednekar slams bjp over Malad Building Collapse incidents)

संबंधित बातम्या:

Malad building collapse : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू, दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले

Malad Building Collapsed | मी बाहेर पडलो आणि तीन इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या, मालाड इमारत दुर्घटना नेमकी कशी घडली?

Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर, पाहा संपूर्ण यादी

(mayor kishori pednekar slams bjp over Malad Building Collapse incidents)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.