AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण? तटकरे यांच्या त्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या, पडद्याआड मोठ्या घडामोडी

NCP Merger Sunil Tatkare : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सर्व मतभेद दूर सारू 18 वर्षानंतर 5 जुलै रोजी एकाच मंचावर दिसले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली. त्यात सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण? तटकरे यांच्या त्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या, पडद्याआड मोठ्या घडामोडी
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 19, 2025 | 12:29 PM
Share

सर्व मतभेद दूर सारत दोन ठाकरे 5 जुलै रोजी एकाच मंचावर आले. मराठीच्या मुद्यावर त्यांनी एकला चलो रे ऐवजी ‘आम्ही दोघे भाऊ एक होऊ’ असे संकेत दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी दोन्ही खेम्यातील नेत्यांनी एकत्रिकरणाचा सूर आळवला आहे. दस्तूरखुद्द शरद पवार यांनी अगोदर विरोध पण नंतर अनुकूल संकेत दिले आहेत. आता अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांनी पुन्हा वातावरण ढवळले आहे.

शरद पवार यांनी काय दिले संकेत?

28 जून 2025 रोजी कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले होते. मनसे आणि शिवसेना एकाच मंचावर आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. राजकारणात मतभेद विसरून एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच. त्यामुळे सगळे मतभेद विसरून आम्ही एकत्र येत असू तर ते चांगलेच आहे असे स्पष्ट संकेत पवारांनी त्यावेळी दिले होते. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले तर वाईट वाटायचे काम नाही असे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर त्यांनी भाष्य केले होते.

भाजपाशी बोलावे लागेल

तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी बोलावे लागले असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ जर आली तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावे लागले असे मोठे वक्तव्य तटकरे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याविषयीची चर्चा सुरू झाली. त्यावरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा अजून दूर दिसत आहे. माझ्यापर्यंत तरी अशी काही चर्चा आली नाही असे तटकरे म्हणाले. तर मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा तटकरे यांच्या मताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात भाजप काय भूमिका घेतो हे अद्याप समोर आलेले नाही. पण निदान चर्चा होत आहे. दोन्ही बाजूची नेते मंडळी भूमिका आणि मतं मांडत असल्याचे दिसून येते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.