गरीब आणि मजूरांना शिवभोजनचा मोठा आधार, 3 कोटी नागरिकांकडून आस्वाद : छगन भुजबळ

राज्यात 26 जानेवारी 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत तब्बल 3 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतलाय.

गरीब आणि मजूरांना शिवभोजनचा मोठा आधार, 3 कोटी नागरिकांकडून आस्वाद : छगन भुजबळ
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 8:59 PM

मुंबई : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये या उद्देशाने ठाकरे सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. यानंतर राज्यात 26 जानेवारी 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत तब्बल 3 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतलाय. स्वतः अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली (Minister Chhagan Bhujbal comment on 3 Crore record break distribution of Shivbhojan Thali).

राज्यात 26 जानेवारीला या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ 10 रुपयांमध्ये राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने मार्चमध्ये केवळ 5 रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने 5 रुपयात शिवभोजन देण्याच्या निर्णयाला मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेविषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होऊ नये हा मुख्य उद्देश आहे. यासाठी शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आलाय. प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आलीय. तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी 11 ते 3 या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.”

‘शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन अनुदान’

“शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन अनुदान देत आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत वाढ करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात 79 हजार 918, फेब्रुवारी महिन्यात 4 लाख 67 हजार 869, मार्च महिन्यात 5 लाख 78 हजार 31 नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात अनुक्रमे 24 लाख 99 हजार 257, 33 लाख 84 हजार 040, 30 लाख 96 हजार 232 इतक्या लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला,” असंही भुजबळ यांनी नमूद केलं.

शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम, 3 कोटी नागरिकांकडून शिवभोजन थाळीचा आस्वाद

लॉकडाऊननंतरच्या काळात जुलै महिन्यात 30 लाख 3 हजार 474, ऑगस्ट महिन्यात 30 लाख 60 हजार 319, सप्टेंबर महिन्यात 30 लाख 59 हजार 176, ऑक्टोबर 31 लाख 45 हजार 63, नोव्हेंबर 28 लाख 96 हजार 130, डिसेंबरमध्ये 28 लाख 65 हजार 943 तर आजपर्यंत (20 जानेवारी) 19 लाख 26 हजार 54 गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. आज शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून आजपर्यंत तब्बल 3 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतलाय.

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या या शिवभोजन थाळी योजनेचा असाच वाढता प्रतिसाद राज्य शासनास प्रेरणादायी आहे. तसेच राज्यातील गरीब, मजूर आणि कामगार वर्गाला या योजनेचा फायदा आहे. त्यामुळे समाधान वाटत असल्याची भावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

शिवभोजन थाळीची घोषणा शिवसेनेची, उपक्रम महाविकासआघाडीचा : छगन भुजबळ

ज्यांची ऐपत आहे, त्यांनी शिवभोजन थाळी खाऊ नये : अजित पवार

रत्नागिरीत 10 रुपयांच्या शिवभोजन थाळीत चिकन

व्हिडीओ पाहा :

Minister Chhagan Bhujbal comment on 3 Crore record break distribution of Shivbhojan Thali

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.