मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Mira Bhayandar Shiv sena Corporator died due to corona)

मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 09, 2020 | 11:58 AM

ठाणे : मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Mira Bhayandar Shiv sena Corporator died due to corona) शिवसेनेच्या या नगरसेवकावर ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आठवड्यापूर्वी या नगरसेवकासह त्यांची आई, बायको आणि भाऊ यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला होता.  तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. (Mira Bhayandar Shiv sena Corporator died due to corona)

संबंधित नगरसेवक हे मिरा भाईंदर महानगरपालिकेत दोन वेळा निवडून आले होते. या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून कार्यरत होते. आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून संबंधित नगरसेवकाची ओळख होती.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर

महाराष्ट्रात काल (8 जून) 2 हजार 553 नवीन (Total COVID-19 Patient In Maharashtra) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 88 हजार 528 वर पोहोचला आहे. यापैकी एकूण 40 हजार 975 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 44 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Total COVID-19 Patient In Maharashtra) यांनी दिली.

महाराष्ट्राने चीनला मागे टाकलं

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आधी भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येने चीनमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला पिछाडीवर सोडलं होतं. आता एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाल्याने चिंता वाढली आहे.

चीनमध्ये आतापर्यंत एकूण 83,040 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा संपूर्ण चीन देशातील कोरोना रुग्णांपेक्षा जास्त झाला आहे.

संबंधित बातम्या  

चिंताजनक! आधी भारताने, आता महाराष्ट्रानेही कोरोना रुग्णसंख्येत चीनला टाकलं पिछाडीवर

ठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचं निधन, हॉटेलमध्ये मृतदेह आढळला

डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती, महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्ला

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, माजी खासदार-माजी नगरसेवकालाही संसर्ग

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.