AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toll Rates | भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?, शिवसेनेचा सवाल

भाजपने त्यांच्या काळात मुंबई आणि पुण्यातील टोलनाके का बंद केले नाहीत, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभूंनी केला आहे. (Sunil Prabhu criticizes bjp on Toll)

Toll Rates | भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?, शिवसेनेचा सवाल
Akshay Adhav
Akshay Adhav | Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 25, 2020 | 6:30 PM
Share

मुंबई- संपूर्ण राज्यात भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं? हे आधी त्यांनी सांगावं, असा  सवाल शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी विचारला आहे. मुंबईतल्या टोलदरवाढीवरून भाजपने टीका केली होती. त्यांच्या टीकेला सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं आहे. (MLA Sunil Prabhu reply Bjp Over Toll Rate Increases)

ऐन कोरोनाच्या काळात मुंबईतल्या टोल दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आता वाढीव बोजा पडणार आहे. याच मुद्दयावरून भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनाच्या काळात नागरिकांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना सरकारने नागरिकांचा विचार करायला हवा होता, असा सल्ला भाजपने दिला होता.

भाजपच्या टीकेला उत्तर देताना सुनील प्रभू म्हणाले, “2002 मध्ये जे सरकार सत्तेवर होतं त्यांच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरवाढ होत असते. आरोप करण्या आधी भाजपने कारण तपासायला हवं होतं”

“2002 साली जे सरकार होतं त्यांनी करार केला होता. त्यानुसार दर तीन वर्षांनी टोल दरवाढ होईल. त्यामुळे करारानुसार टोलवाढ झाली आहे, असं सुनील प्रभू म्हणाले. सध्या दरवाढ झाल्यानंतर त्यानंतर 2023 आणि त्यानंतर 2026 ला टोलदर होईल. त्यामुळे करारनुसार पैसे वाढले आहेत. त्यामुळे कुणीही राजकारण करू नये”, असं प्रभू म्हणाले.

पुढे बोलताना सुनील प्रभू म्हणाले, “संपूर्ण राज्यात टोल मुक्तीचं आश्वासन भाजपने दिलं होतं त्याचं काय झालं हे त्यांनी आधी जाहीर करावं. तर मुंबई आणि पुणे टोलनाके का बंद केले नाहीत याचंही उत्तर त्यांनी द्यावं”

मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात वाढ-

येत्या 1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात 5 ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे आधीच आर्थिक परिस्थितीला तोंड देणाऱ्या मुंबईकरांवर आता वाढीव टोलचाही बोजा येणार आहे.

मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत. 2002 ते 2027 या 25 वर्षांत शहरातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीच्या खर्च वसुलीसाठी हे टोलनाके उभारण्यात आले आहेत. एमईपी कंपनी आणि राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार, आता 1 ऑक्टोबरपासून टोल दरात वाढ होणार आहे.

नवीन दरांनुसार हलक्या वाहनांच्या टोल दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता टोलचा 35 रुपयांवरुन 40 रुपये होईल. तर, प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन त्यासाठी आता 65 रुपये मोजावे लागणार आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यासाठी आता 105 नाही तर 130 रुपये द्यावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या-

Toll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5 ते 25 रुपयांची वाढ

एकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन

(MLA Sunil Prabhu reply Bjp Over Toll Rate Increases)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...