राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे.

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Uddhav thackeray, Supriya Sule

मुंबईराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. (MP Supriya Sule Wrote letter To Cm Uddhav thackeray Over Constitution Pillar)

महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा, असं म्हणत संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

“भारताच्या संविधानाप्रती जागरुकता निर्माण व्हावी, भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या भावनेतून बारामती लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकेच्या क्षेत्रात संविधान स्तंभ उभारले आहेत. हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून तो राज्यभरात राबविण्याची आवश्यकता आहे”,  असं मत सुप्रिया सुळे यांनी पत्रात मांडलंय.

“माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा. संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी हे आवश्यक आहे”, असं सरतेशेवटी त्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच आपण यावर नक्की सकारात्मक निर्णय घ्याल हा विश्वास आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा क्षेत्रात संविधान स्तंभ

सुप्रिया सुळे नेतृत्व करत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, आणि खडकवासला यामधील  नगरपालिका, नगरपरिषदा तसंच निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ आहेत. राज्यात प्रथमच अशी अभिनव संकल्पणा सुप्रिया सुळे यांनी मांडली आणि त्याची अंमलबजावणीही केली.

(MP Supriya Sule Wrote letter To Cm Uddhav thackeray Over Constitution Pillar)

हे ही वाचा :

जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, त्यात गैर काय?, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी, फॉर्म्युलाही सांगितला

Published On - 12:08 pm, Tue, 26 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI