जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, त्यात गैर काय?, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, त्यात गैर काय?, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेला शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तितकीच बोलकी आणि दिलखुलास कमेंट दिली.

Akshay Adhav

|

Jan 22, 2021 | 9:12 AM

कोल्हापूर :  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी (बुधावार) त्यांच्या मनातली मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. जाहीरपणाने मुख्यंमंत्रिपदाविषयी इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत. राज्याचे उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांना शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तितकीच बोलकी आणि दिलखुलास कमेंट दिली. (MP Supriya Sule On jayant patil Cm Post Statement)

“राजकीय जीवनात काम करत असताना इच्छा आकांक्षा असतात. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला आहे. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय?”, अशी खास प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तसंच त्यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत होत्या. भाजपने फटकेबाजी करत आता फक्त रोहित पवारांनाच मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पडायचं राहिलंय, असा चिमटा काढला तर अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेला पाठिंबा दिला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले…?

इस्लामपुरात एका स्थानिक चॅनेलशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची राजकीय महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. जयंत पाटील यांच्या इच्छेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मुंबईत पत्रकारांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांच्या इच्छाला माझा पाठिंबा आहे, असं ‘बोलकं’ उत्तर अजित पवार यांनी दिलं.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले…?

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. मला हे माहितीय की आमच्याकडे 54 आमदार आहे. 54 आमदारांचा कसा मुख्यमंत्री होणार? त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

जयंतरावांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची इच्छा पण ते खरंच शक्य…?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुमारे डझनभर नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्री होती का? याबाबत राजकीय निरीक्षकांच्या मनात साशंकता आहे. राष्ट्रवादीत अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे आदी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले अनेक चेहरे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदात अनेक अडथळे असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

माझ्या विधानाची मोडतोड- जयंत पाटील

“इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमतमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती”, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं.

हे ही वाचा

जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणाले….

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें