LIVE बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, युनियनमध्ये फूट?

BEST Strike मुंबई : बेस्ट कृती समिती,  महापालिका आयुक्त आणि प्रशासनाची बैठक दुपारी  संपली. मात्र या बैठकीत कुडलाही तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. मात्र बेस्ट संपाबाबत बेस्ट युनियन मध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. बेस्ट कृती समिती संप सुरु ठेवण्यावर ठाम आहे तर, बेस्ट कामगार सेना संप सुरु ठेवायचा की नाही याबाबत संध्याकाळी निर्णय जाहीर करणार […]

LIVE बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, युनियनमध्ये फूट?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

BEST Strike मुंबई : बेस्ट कृती समिती,  महापालिका आयुक्त आणि प्रशासनाची बैठक दुपारी  संपली. मात्र या बैठकीत कुडलाही तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. मात्र बेस्ट संपाबाबत बेस्ट युनियन मध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. बेस्ट कृती समिती संप सुरु ठेवण्यावर ठाम आहे तर, बेस्ट कामगार सेना संप सुरु ठेवायचा की नाही याबाबत संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहे. बेस्ट कामगार सेना ही संघटना शिवसेनाप्रणित आहे, या संघटनेतील 11 हजार बेस्ट कर्मचारी आज संपावर आहेत.  यापूर्वी बेस्ट संपात सहभागी होणार नसल्याचं बेस्ट कामगार सेनेनं जाहीर केलं होतं. मात्र, आज शिवसेनेनंदेखील संपाला नैतिक पाठिंबा दिला. त्यामुळे, आजच्या बेस्ट संपाबाबत शिवसेनेची भूमिका गोंधळलेलीच दिसली. एकीकडे संप नको चर्चा करा, असं आवाहन करणाऱ्या शिवसेनेच्याच बेस्ट कामगार सेनेचे (शिवसेनाप्रणित संघटनेचे) 11 हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं, शिवसेनेची गोची झाली आहे.

विविध मागण्यांसाठी बेस्टचे सुमारे 30 हजार 500 कर्मचारी  मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे आज चाकरमान्यांचे हाल होत आहेत. तर संप पुकारल्यास मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे. या संपामुळे बेस्टला खूप मोठा तोटा सहन करावा लागू शकतो, बेस्टचा एका दिवसाचा 3 कोटींचा महसूल बुडू शकतो. वेतनवाढ, वेतननिश्चिती तसेच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका ‘अ’ अर्थसंकल्पात विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा गाड्या सोडण्यासाठी एसटी महामंडळाला पत्र दिल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्याने सांगितलं. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने पर्यायी व्यवस्था कागदावरचं असल्याचं वास्तव आहे.

आशिष चेंबूरकर बेस्ट समिती अध्यक्ष

आयुक्तांनी संप मागे घ्या, बैठक घेऊन मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे कृती समितीला सांगितले. औद्योगिक कोर्टाने संप करू नये असे आदेश दिले आहेत. अभ्यास करण्यासाठी वेळ मिळायला हवा असे आयुक्तांनी सांगितले. सामंजस्यपणे कृती समितीने मार्ग काढला नाही. संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल असे वाटते. वेतन निश्चितीचा काय परिणाम होईल हे पाहावे लागेल. भूखंड विक्रीचा प्रश्नच नाही, असं आशिष चेंबूरकर यांनी सांगितलं.

दुसरीकडे आम्ही संपावर ठाम आहोत असा पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. “या संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र ही बैठक केवळ दिखाव्यासाठी होती. या बैठकीला बेस्टचे जनरल मॅनेजर सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित नव्हते. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नसून मागील दोन वर्षांपासून त्यांनी आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही केलेला नाही”, असा आरोप बेस्ट कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.

लोकल वगळता मुंबईची आणखी एक लाईफ लाईन म्हणजे बेस्ट आहे. गेली अनेक वर्ष बेस्ट कर्मचारी आपल्या मागण्या प्रशासनापुढे मांडत आले आहेत. मात्र, पालिकेकडून नेहमी आश्वासनं मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बेस्ट कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं, ते ही पूर्ण केलं नाही, त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे.

दोन दशकांपासून आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाची परिस्थिती नाजूक आहे. वेतनाची अनिश्चिती, कामगार सवलती आणि भत्त्यांमध्ये कपात अशा अनेक कारणांमुळे बेस्टच्या कामगारांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला आहे, याला सेनेच्या युनियनेही पाठिंबा दिला आहे.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

* ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.

* 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.

* एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.

* 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.

* कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.

* अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.