बेस्ट संप : सहाव्या दिवशीही संप सुरुच, अद्याप तोडगा नाही!

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप (BEST Strike) सलग सहाव्या दिवशी सुरु आहे. काल म्हणजे 12 जानेवारीला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. पर्यायाने, हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय बेस्टच्या कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे ना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन किंवा सत्ताधारी तोडगा काढत नाहीत, ना मुंबईकरांचे बेस्टविना होणारे हाल कमी होत. मेगाब्लॉकमधून सुटका […]

बेस्ट संप : सहाव्या दिवशीही संप सुरुच, अद्याप तोडगा नाही!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप (BEST Strike) सलग सहाव्या दिवशी सुरु आहे. काल म्हणजे 12 जानेवारीला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. पर्यायाने, हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय बेस्टच्या कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे ना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन किंवा सत्ताधारी तोडगा काढत नाहीत, ना मुंबईकरांचे बेस्टविना होणारे हाल कमी होत.

मेगाब्लॉकमधून सुटका

रेल्वेच्या मेगाब्लॉकमधून (Railway Megablock) मात्र आज मुंबईकरांची काहीप्रमाणात सुटका झाली आहे. आज मध्य रेल्वेवर बदलापूर ते कर्जत दरम्यान मेगाब्लॉक असेल, तर इतर ठिकाणी नियमित रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येतील. तसेच, पश्चिम मार्गावर सकाळी साडेदहा ते साडेतीनपर्यंत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान अप धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. पण या ब्लॉकचा अधिक परिणाम आज जाणवणार नसल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे.

मनसेचा पाठिंबा

मनसेनंही (MNS) बेस्ट कर्मचा-यांच्या संपाला पाठींबा दिला आहे. शिवसेनेनं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप मनसेनं केला. तसंच सरकारनं बजावलेल्या मेस्माच्या नोटीसची होळीही मनसेनं केली. तर माहिममध्ये कनेकिया बिल्डर विरोधात मनसेने आंदोलन केले. यावेळी बेस्टच्या जागेवर सुरु असलेले कनेकिया बिल्डरचे काम मनसेने थांबवले. बेस्टचे 320 कोटी रुपये कनाकिया बिल्डरकडे थकित ठेवल्याचा आरोप करत हे काम थांबवत मनसेने आंदोलन केले.

बसपाचा पाठिंबा

बेस्टच्या संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच आता बहुजन समाज पक्षानं ही बेस्टच्या संपक-यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बेस्टच्या मोठ्या जागा बिल्डरला विकून बेस्टला मुद्दाम शिवसेना आणि भाजप तोट्यात दाखवत असल्याचा आरोप बसपानं केला आहे.

भुजबळांचा आरोप

बेस्टच्या संपाला शिवसेना-भाजपच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. ते खेडमध्ये पक्षाच्या परिवर्तन निर्धार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

बेस्ट संपाचा इतिहास, आतापर्यंतचा सर्वात मोठा संप

  • 1997 मध्ये 4 दिवसाचा संप झाला होता, कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्त्वात  हा संप झाला होता.
  • 2007 मध्ये-  महाव्यवस्थापक खोब्रागडे असताना एक संप झाला होता , 3 दिवसाचा संप होता, पण यावेळी महाव्यवस्थापकांनी काही कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून नवीन कामगार भरती केली होती, यावेळी कामगार नेते शरद राव अध्यक्ष होते
  • 2011 मध्ये – यावर्षी सुद्धा 3 दिवसाचा संप झाला होता.
  • 2017- मध्ये कामगार नेते शरद राव यांच्यानंतर शशांकराव यांनी धुरा घेतली. यावेळी 1 दिवसाचा संप झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं होतं.
  • 2019- यंदा सहावा दिवस संप सुरु आहे

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

  • ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
  • 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी. एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
  • 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
  • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.
Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.