AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत तीन मजली चाळीचा भाग कोसळला, 7 जखमी, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली

मुंबईच्या वांद्रे पूर्वेतील भारत नगरमध्ये एका तीनमजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे.

मुंबईत तीन मजली चाळीचा भाग कोसळला, 7 जखमी, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली
वांद्रे इमारत दुर्घटना
| Updated on: Jul 18, 2025 | 11:12 AM
Share

मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील भारत नगर या ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली. भारत नगर भागात आज (शुक्रवारी) पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५:५६ वाजता भारत नगर येथील चाळ क्रमांक ३७ चा दुसरा आणि तिसरा मजला कोसळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या या ठिकाणी ढिगाऱ्याखाली ८ ते १० लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई फायर ब्रिगेडने (MFB) तात्काळ लेव्हल-२ चा अलर्ट जारी करत बचाव मोहीम हाती घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई पोलीस, MHADA, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), अदानी ग्रुप, बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका असे अनेक विभाग आणि संस्था बचावकार्यात सक्रियपणे सहभागी झाले आहेत.

7 जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव मोहिमेसाठी २ ADFO (सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी), ५ वरिष्ठ फायर ऑफिसर (SrSO), १ स्टेशन ऑफिसर (SO), ५ फायर इंजिन, १ मोबाइल वर्कशॉप टीम (MWT), १ कमांड आणि कंट्रोल फायर युनिट (CFF), १ फोर्स टेंडर (FT), १ रेस्क्यू व्हेईकल (RV), आणि १ वॉटर क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (WQRV) असे मोठे पथक तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत ७ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे.

रुग्णालयात उपचार सुरु

त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हे बचावकार्य पूर्ण होईपर्यंत स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...