मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट सातवरुन पाचवर, ‘जी दक्षिण’मध्येच तीनशेपार रुग्ण

आता 85 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या असल्यास 'अतिगंभीर' विभाग समजण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Mumbai Corona Hotspots decreased)

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट सातवरुन पाचवर, ‘जी दक्षिण'मध्येच तीनशेपार रुग्ण

मुंबई : मुंबई महापालिकेने ‘कोरोना’ हॉटस्पॉटचे निकष बदलल्यामुळे हॉटस्पॉटची संख्या कमी झाली आहे. नव्या निकषानुसार अतिगंभीर हॉटस्पॉटची संख्या सातवरुन पाचवर नेण्यात आली आहे. गंभीर स्थिती असलेल्या विभागांची संख्या आठवर नेण्यात आली आहे. 13 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईत 1549 कोरोनाग्रस्त असून ‘जी दक्षिण’मध्ये सर्वाधिक म्हणजे  308 रुग्ण आहेत. (Mumbai Corona Hotspots decreased)

निकषात कोणते बदल?

आतापर्यंत 50 पेक्षा अधिक रुग्ण असल्यास ‘अतिगंभीर’ विभाग समजला जात असे, आता मात्र 85 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या गेल्यास ‘अतिगंभीर’ विभाग समजण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

सध्या 30 ते 50 कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या असलेल्या विभागास ‘गंभीर’ समजले जाई, पण आता 50 ते 84 असा नवा निकष गंभीर विभागासाठी केला आहे.

अतिगंभीर वॉर्ड- रुग्णसंख्या 

जी दक्षिण –  वरळी, लोअर परळ, करी रोड – 308

ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर -125

डी- मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 107

एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 86

एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 85

कुठे किती रुग्ण? 

जी दक्षिण – 308

ई – 125

डी – 107

एम पूर्व – 86

एच पूर्व – 85

के पूर्व – 83

जी उत्तर – 83

एल – 81

के पश्चिम – 80

एम पश्चिम – 55

(Mumbai Corona Hotspots decreased)

पी उत्तर – 55

एफ उत्तर – 54

दक्षिण – 52

एफ दक्षिण – 41

उत्तर – 36

आर दक्षिण – 36

एच पश्चिम – 34

पी दक्षिण – 33

बी –29

ए – 27

आर मध्य – 26

आर उत्तर – 13

मध्य – 11

टी – 09

(Mumbai Corona Hotspots decreased)

Published On - 3:25 pm, Tue, 14 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI